अकबर अहमद डंपी
भारतीय राजकारणी
अकबर अहमद डम्पी ( जून ३०, इ.स. १९४८-हयात) हे भारत देशातील राजकारणी आहेत.१९७० च्या दशकात ते संजय गांधींचे सहकारी होते.नंतरच्या काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून बाहेर पडले.ते बहुजन समाज पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील आझमगढ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.