अंत्री खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे.शिराळा शहरापासून उत्तरेला 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंत्री खुर्द []येतील श्री स्वयंभू गणेश मंदिर, तीर्थक्षेत्र विकास वर्ग क अंतर्गत समाविष्ट असलेल देवस्थान हे पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील गणेश भक्तांच्या अस्थेचा केंद्रबिंदू आहे.श्री स्वयंभू गणेश म्हणजे जमिनीतून स्वयं उगम पावलेली एकाच शिल्पातील मूर्ती म्हणजे साक्षात गणपतीच प्रकट झाला आहे ही अख्यायिका इथे प्रचलित आहे.नावासाला पावणारा गणपती म्हणून याची ओळख जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर देखील आहे.

  ?अंत्री खुर्द

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर शिराळा
जिल्हा सांगली जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भौगोलिक स्थान

संपादन

उत्तरेला मानकरवाडी पूर्वेला अंत्री बुद्रुक आणि तडवळे दक्षिणेला रिळे, मोरेवाडी पश्चिमेला वाकूर्डे खुर्द अशी गावच्या सीमेला असलेल्या गावांची नावे आहेत.[]

हवामान

संपादन

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळ्याचा मोसम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते.फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो.उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन

संपादन

गावातील साक्षरतेचे प्रमाण दिवसेंदिवस सुधरत असल तरी लोकांमधील संकुचित वृत्ती, न्यूनगंड, बेरोजगारी यांमुळे आर्थिक दृष्टया मागासलेपण दिसून येत. कोरडवाहू शेती आणि जेमतेम पशुपालन व्यवसाय हे इथल्या सामान्य लोकांचं उदरनिर्वाहाच साधन. मर्यादित शेती क्षेत्र असल्याने आणि इतर उदरनिर्वाहची साधन नसल्याने गावातील 50% पेक्ष्या जास्त लोक ही मुंबई पुण्याला कामा निम्मित राहतात आणि बहुदा त्यांचं शिक्षण कमीच असल्याने भाजीपाला व्यापारी, हमाली कामगार, वाशी मार्केट क्राफरर्ड मार्केट मुंबई ला व्यापाऱ्यांच्या हाताखाली कामगार म्हणून काम करनाऱ्यांची संख्या जास्त आहे.[]

गावी राहून उच्च शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी गव्हर्नमेंट आणि private सेक्टर मध्ये नोकरीं करणाऱ्यांची संख्या तशी हाताच्या बोटावर मोजण्याऐवढीच!

मुंबई पुणे आणि इतर ठिकानि उदरनिर्वाहा साठी गेलेल्या लोकांची गावाबद्दल ची आस्था आणि मतं फारशी चांगली नसली तरी गणेशोत्सवासाठी लोकवर्गणी आणि इतर सामाजिक कार्यासाठी एकजूट दिसून येते.

स्वयंभू श्री गणेश मंदिर हे पंचक्रोशीतील गणेश भक्तांच्या अस्थेचा केंद्रबिंदू आहे.तीर्थक्षेत्र विकास वर्ग क मध्ये समाविष्ट आहे.नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ओळख तालुक्यात आणि तालुक्याच्या बाहेर देखील आहे. दरवर्षी गणेश उत्सव मोठया आनंदाने एकजुटीने साजरा केला जातो. हजारो गणेशभक्त गणेश चतुर्थी ते अनंत चथुर्थी या गणेशोत्सवात इथे जमिनीतून स्वयं उगम झालेल्या श्री स्वयंभु गणेश्याच दर्शन घेतात.

एक गाव एक गणपती हे प्रथा संपूर्ण तालुक्यात गेल्या 50 वर्ष्यापेक्षा जास्त काळ एकजुटीने केवळ इथेच यशस्वी रित्या राबवली जाते.गावाचे प्रतिष्टीत नागरिक हरी पाटील यांच्या पुढाकारणे 1972 साली सुरू झालेली ही प्रथा आज देखील अबाधित आहे.[]

श्री स्वयंभू गणेश मंदिर हे गावातील एकोपा ठिकवून ठेवणार एकमेव कारण आहे.

श्री ज्योतिबा हे ग्रामदैवत असून ते एक जागृत देवस्थान मानलं जात.

गणेशोत्सव काळात गावातील सर्व तरुण, अबाल वृद्ध, महिला राजकीय अभिनिवेश, गट-तट,भाऊबंधकितील वैर सर्व बाजूला ठेवून सामाजिक सौख्य निर्माण करून भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच लोकांकल्यानाचे उपक्रम हाती घेऊन संस्कृती जपण्याचा यशस्वी प्रयत्न करतात तसेच एकजूट आणि एकसंधपनाची भावना अबाधित ठेवतात.[] गणेशोत्सव काळात जमा झालेली वर्गनि आणि भाविकांनी दिलेली देणगी याच्यातून येणाऱ्या उत्पन्नातून गावातील इतर मंदिराचं सुशोभीकरण करणे, पथ दीप लावणे, शाळेसाठी लागणार साहित्य खरेदी करणे, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तसेच ग्रामपंचायत योजणांसाठी सढळ हातानी मदत करण्याच काम युवा मंदिर व्यवस्थापन आणि मंडळ योग्यरित्या आपली जबाबदारी पार पाडताना दिसत.भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला सामूहिक महाप्रसादाचा कार्यक्रम दिमाखात पार पाडला जातो.

जात पात धर्म या पलीकडे जाऊन गावातील नवीन पिढी नव्या विचाराने हाच एकोपा पुढे चावलण्याचा यशस्वी प्रयत्न करताना दिसते.

-अरुण आनंदा पाटील.


प्रेक्षणीय स्थळे

संपादन

1.स्वयंभू गणेश मंदिर

2. ज्योतिबा मंदिर

3.मारुती मंदिर

4.यल्लामा मंदिर

5.विठ्ठल रुक्मिणी मंदिर

नागरी सुविधा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
  1. ^ अरुण पाटील यांच्या मुलाखतीतून
  2. ^ अरुण पाटील यांच्या मुलखतीतून
  3. ^ अरुण पाटील यांच्या मुलाखतीतून
  4. ^ अरुण पाटील यांच्या मुलाखतीतून
  5. ^ अरुण पाटील यांच्या मुलाखतीतून