काही वर्षांपूर्वी कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असल्याने शाळा न शिकणाऱ्या तथा शाळेत न येणाऱ्या मुलांची संख्या फार मोठी होती. तेव्हा शासनाने गावोगावी किवा गरजेच्या ठिकाणी अंगणवाडी केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. या अंगणवाडी केंद्रात विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी अंगणवाडी सेविका नेमण्यात आल्या. अंगणवाडी सेविकांच्यास कनिष्ट स्तरावर मदतनीस हे पद आहे, तर उच्च स्तरावर अंगणवाडी पर्यवेक्षक हे पद आहे. या सर्वांच्या समन्वयातून प्रत्येक कुटुंबातील मुले औपचारिक शिक्षण घेत आहेत. या अंगणवाडी केंद्रांमुळे शाळाबाह्य मुलांचे प्रमाण किंवा गळतीचे प्रमाण कमी झाले आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका यांचा मोठा वाटा आहे.[]

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "अंगणवाडी ताईंना मिळणार 'गूड न्यूझ'! दोन-अडीच हजारांनी वाढणार मानधन". eSakal - Marathi Newspaper. 2023-01-11 रोजी पाहिले.