अँड्रिया कॉर

आयरीश संगीतकार, गीतकार, गायिका

अँड्रिया जेन कॉर (एमबीई) (जन्म १७ मे १९७४) ह्या एक आयरीश संगीतकार, गीतकार, गायिका आणि अभिनेत्री आहेत. त्या ‘द कॉर्स’ ह्या आयरिश बॅंडच्या सदस्या आहेत. त्यांनी १९९० साली, आपले बंधू आणि भगिनी, कॅरोलीन, शॅरोन आणि जिम कॉर ह्यांच्याबरोबर, द कॉर्स बॅंडच्या मुख्य गायिका म्हणून पदार्पण केले. त्या चौघांचा हा बॅंड सेल्टीक फोक रॉक आणि पॉप रॉक प्रकारचे संगीत तयार करतो. त्या गाण्याव्यतिरीक्त, टीन व्हिसल, उकुलेले आणि पियानो देखील वाजवतात.[]

अँड्रिया जेन कॉर

अँड्रिया कॉर
आयुष्य
जन्म १७ मे १९७४
जन्म स्थान डंडाल्क
संगीत कारकीर्द
पेशा संगीतकार, गायिका
गौरव
गौरव एम. बी. ई.

सुरुवातीचे आयुष्य

संपादन

अँड्रिया कॉर गेरी कॉर आणि जीन ह्यांच्या कन्या आहेत. त्या कॉर्स भावंडांमधल्या सर्वात लहान आहेत.[] त्यांचे बालपण डंडाल्क, आयर्लंड येथे गेले. गेरी आणि जीन ह्यांचा स्वतःचा साऊंड अफेअर नावाचा बँड होता. ते एबीबीए आणि द ईगल्स ह्या बँडची गाणी गात असत आणि वाजवत असत. ते डंडाल्क गावातील हॉटेलमध्ये सादरीकरण करत असत. तिथे ते आपल्या मुलांनासुद्धा घेऊन जात असत.

आपल्या आई वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्या टीन व्हिसल शिकल्या आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना पियानो शिकवला.[] त्या लहानपणापासून आपल्या भावंडांबरोबर घरी गात असत आणि विविध वाद्यांचा सराव करत असत. अँड्रिया मुख्यत: गात असत, शॅरोन व्हायोलिन वाजवत असत, आणि कॅरोलीन आणि जिम कीबोर्ड वाजवत असत. अँड्रिया आपल्या शाळेतील नाटकांमध्येसुद्धा सहभागी होत असत.[]

कारकीर्द

संपादन

द कॉर्स ह्या बॅंड बरोबर त्यांनी आत्तापर्यंत सहा स्टुडियो अल्बम, दोन एकत्रित अल्बम्स, एक रिमिक्स अल्बम आणि दोन प्रत्यक्ष अल्बम प्रसिद्ध केले आहेत. अँड्रिया ह्यांनी २००७ साली, टेन फीट हाय हा पहिला एकल अल्बम प्रसिद्ध केला. त्यांनी आपला पुढचा अल्बम ३० मे २०११ ह्या दिवशी प्रसिद्ध केला. त्या अल्बममध्ये त्यांच्यासाठी त्यांच्या लहानपणी महत्त्वाची असलेली गाणी त्यांनी स्वतःच्या स्वरात गायली आहेत.[][]

सामाजिक कार्य

संपादन

अँड्रिया ह्यांनी अनेक धर्मादाय उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. पावरोती अँड फ्रेंड्स लीबेरीयन चिल्ड्रन्स विलेज, इंग्लंडमधील न्यू कॅसल अपॉन टाईन येथील फ्रीमन हॉस्पिटल, उत्तर आयर्लंड येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या बळींसाठी द प्रिन्स ट्रस्ट ह्या संस्थांसाठी त्यांनी निधी संकलनासाठी कार्यक्रम केले.[] आफ्रिकेतील ‘नेल्सन मंडेला ४६६६४’ ह्या एड्स रोगाबद्दलच्या मोहिमेमध्ये त्या सहभागी होत्या. २ जुलै २००५ रोजी, एडीनबर्ग येथे द कॉर्स ह्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी ‘मेक पॉवर्टी हिस्टरी’ ह्या मोहिमेचा प्रचार करत बोनो ह्यांच्याबरोबर ‘व्हेन द स्टार्स गो ब्ल्यू’ हे गाणे सादर केले. २००५ साली, त्यांच्या संगीत आणि धर्मादाय क्षेत्रातील त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांच्या भावंडांसमवेत राणी एलिझाबेथ ह्यांच्याकडून एम. बी. ई. हा सन्मान मिळाला.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ a b "Absolute Divas - The Corrs Biography". web.archive.org. 2016-03-03. रोजी मूळ पानापासून संग्रहित2016-03-03. 2020-07-30 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "MBEs for The Corrs". independent (इंग्रजी भाषेत). 2020-07-30 रोजी पाहिले.
  3. ^ "The Corrs Biography". www.musicianguide.com. 2020-07-30 रोजी पाहिले.
  4. ^ Kilkelly, Daniel (2006-03-25). "No new material planned for The Corrs". Digital Spy (इंग्रजी भाषेत). 2020-07-30 रोजी पाहिले.
  5. ^ "Andrea Corr goes solo". web.archive.org. 2007-09-27. 2007-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-30 रोजी पाहिले.
  6. ^ "BBC News | Entertainment | Ally McBeal star sued by real-life lawyers". news.bbc.co.uk. 2020-07-30 रोजी पाहिले.
  7. ^ "City honours The Corrs - National News - Independent.ie". archive.is. 2012-08-03. 2020-07-30 रोजी पाहिले.