हॅलोथेन हे अंतःश्वसनी सामान्य संवेदनाहारक आहे. त्याचे आययुपॅक नाव 2-ब्रोमो-2-क्लोरो-1,1,1-ट्रायफ्लुओरोइथेन आहे. ब्रोमिन अणूचा समावेश असलेले हे एकमेव अंतःश्वसनी संवेदनाहारक आहे. हे रंगहीन व सुवासिक असून प्रकाशात अस्थिर आहे. गडद रंगाच्या बाटल्यांमध्ये ते ठेवले जाते आणि ०.०१% थायमॉल त्यात स्थिरीकरण घटक म्हणून टाकलेले असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आवश्यक औषधांच्या यादीतील हॅलोथेन हे गाभ्याचे औषध आहे. विकसित देशांमध्ये मात्र त्याची जागा नव्या औषधांनी घेतलेली आहे.

हॅलोथेन
हॅलोथेनचे रासायनिक सूत्र
शास्त्रशुद्ध (आययुपॅक) नाव
2-ब्रोमो-2-क्लोरो-1,1,1-ट्रायफ्लुओरोइथेन
चिकित्साशास्त्रीय माहिती
गर्भावस्था धोका ?
वैधिक स्थिती ?
औषधगतिकीय माहिती
चयापचय यकृतीय
परिचायके
CAS number १५१-६७-७
एटीसी संकेत ?
PubChem 3562 CID CID 3562
रासायनिक माहिती
रासायनिक सूत्र C2HBrClF3
Mol. mass १९७.३८१ g/mol
हॅलोथेन रेणूचे त्रिमितीय प्रतिमान

हे सुद्धा पहा संपादन