स्वागत Rajendra1956, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Rajendra1956, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१९८ लेख आहे व १४१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :


दृश्यसंपादकाचे उपयूक्त कळफलक लघुपथ

(कि-बोर्ड शॉर्टकट्स) दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.

साचा {{
संदर्भ <ref
सारणी {|
कळफलक लघुपथ विस्तृत यादी Ctrl+/

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १४:१६, ७ मे २०१४ (IST)Reply

रमेश मंत्री संपादन

मी त्यांचा मुलगा आहे. मला त्यांच्या विषयी बरीच माहिती द्यायची आहे. कशी द्यावी ते कळवावे.

राजेंद्र मंत्री


नमस्कार,
आपली चावडी/ प्रचालक निवेदन येथील साहाय्य विनंती वाचली. आपण साहित्यीक रमेश मंत्री यांच्या बद्दल म्हणता आहात असे गृहीत धरून उत्तर देतो आहे. (ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेले इतर कुणी रमेश मंत्री असतील तर त्यांच्या माहिती बद्दलही स्वागत असेल. अर्थात ज्ञानकोशीय उल्लेखनीयता हा महत्वाचा निकष असेल.)
साहित्यीक रमेश मंत्री या लेखात आपण स्वत: ही लेखन करण्याचे स्वागत असेल, अर्थात आपल्याकडून तटस्थ लेखनाची अपेक्षा असेल, थोडक्यात आपला व्यक्तीगत दृष्टीकोण शक्यतो मिसळला जाणार नाही या दृष्टीने रमेश मंत्री यांच्या बद्दल तीसऱ्या व्यक्तींच्या लेखनाचे, भाषणांचे, (पुस्तकातील प्रस्तावनांचेही) आणि असल्यास टिकेचेही (हे महत्वाचे :) ) 'संदर्भ देत' परिच्छेद लेखन करावे. आपल्या स्वत:च्या लेखनात अतीरंजन, आलंकारीकता, विशेषणे, भलावण इत्यादी ज्ञानकोशीय लेखात टाळणे श्रेयस्कर असते. (अर्थात रमेश मंत्रींचे लेखन जसेच्या तसे उधृत करण्याची वेळ आली तर त्यांच्या स्वत:च्या लेखनातील अलंकारीकता वगैरे ठिक आहे)
विकिपीडियावरील माहिती विकासाचे टप्पे आपण खालील प्रमाणे अनुसरू शकता.
१) मराठी विकिपीडिया शीर्षक लेखन संकेता नुसार लेखाचे शीर्षक पूर्ण नावाचे असणे श्रेयस्कर असते. लेख शीर्षक आपण पूर्ण नावावर स्थानांतरीत करू शकता.
२) रमेश मंत्री लेखात एक {{माहितीचौकट साहित्यिक जोडली आहे. त्यात माहिती भरणे खूप सहज असेल.
३) वर्ग:मराठी लेखक यादीत इतर साहित्यिकांबद्दल माहिती देण्यासाठी कोणकोणते लेख विभाग त्या लेखात बनवले गेले आहेत हे पाहता येईल. व्यक्ती विषयक लेखात साधारणत: परिचय परिच्छेदा नंतर विभाग पाडले जातात. अ) व्यक्तीगत जीवन यात व्यक्तीगत पार्श्वभूमीत बालपण, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमीचा समावेश करता येतो. आ) कारकीर्द यात सुरवातीस नौकरी इत्यादीची माहिती देता येते. इ) साहित्यिक कारकिर्दीची माहिती ई) निव्वळ पुस्तकांची यादी जोडण्यावर समाधानी होण्या पेक्षा प्रस्तावना, समीक्षणे, टिका, विद्यापिठीय संशोधकांनी केलेल्या संशोधन लेखाचे संदर्भ देत माहिती देणे त्या विभागास अधिक न्याय देणारे ठरू शकते. (एखाद्या विशीष्ट ग्रंथ साहित्या बद्दल पुरेसे समीक्षणे, टिका, अथवा विद्यापिठीय संशोधकांनी केलेल्या संशोधन उपलब्ध असल्यास त्या संदर्भाने आपण स्वतंत्र लेख लिहू शकता जसे गदीमांच्या गीतरामायण बद्दल स्वतंत्र लेख आहे) उ)साहित्येतर कारकिर्दीची माहिती


४) कॉमन्स छायाचित्रे येथे आपण रमेश मंत्रींची व्यक्तीगत तसेच सार्वजनिक जीवनातील छायाचित्रे (संबंधीत छायाचित्रकाराकडून प्रताधिकार परवानगी घेऊन) चढवू शकता, मुख्य म्हणजे त्यांच्या महत्वाच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठाची कमी रिझोल्यूशनची छायाचित्रे संबंधीत चित्रकाराच्या आणि प्रकाशकांच्या प्रताधिकार विषयक लेखी परवानगी घेऊन मगच चढवावीत.
४ अ) विकिपीडियावर कोणतेही (संपूर्ण) लेखन अथवा छायाचीत्र कॉपीराईट मुक्त अथवा प्रताधिकार मुक्त करताना/ करवून घेताना ते केवळ विकिपीडिया करताच नव्हे तर सर्वांसाठीच्या पुर्नवापरासाठीही कॉपीराईट मुक्त करावयाची तयारी असेल तरच करावयाचे आहे हे लक्षात घ्यावे. उदाहरणार्थ गीतरामायण केवळ विकिपीडिया पुरते प्रताधिकारमुक्त करु शकण्या बद्दल त्यांच्या पुढच्या पिढीने कळवले होते पण विकिपीडिया असे स्विकारू शकत नाही. अर्थात गीतरामायण या विषयावर एक चांगला ज्ञानकोशीय लेख मराठी विकिपीडियावर आहेच. या संबंधी अधिक माहिती कॉमन्स वर उपलब्ध आहेच काही शंका असल्यास मनमोकळे पणाने विचाराव्यात.
५) आपणास रमेश मंत्री यांचा स्वत: लिहिलेला पूर्ण लेख/लेखन कविता जसेच्या तसे विकिच्या माध्य्मातून (प्रताधिकारमुक्त स्वरुपात) जतन करण्याची इच्छा आता किंवा पुढे मागे झाली तर त्या साठी मराठी विकिस्रोत हा स्वतंत्र बन्धू विकिप्रकल्प आहेत ज्यात लेखकांचे प्रताधिकार मुक्त मूळ लेखन जसेच्या तसे साठवले जाते. जसेकी साने गुरुजींचे s:श्यामची आई अर्थात या विकिस्रोत प्रकल्पासाठी पुढच्या पिढीतील ज्या कोणाकडे/सर्व लोकांकडे कॉपीराईट असेल त्या सर्वांनी लेखन लेखी स्वरूपात कॉपीराईट मुक्त करत असल्याचे नोंदवणे अभिप्रेत असेल.


६) मराठी विकिपीडियावर इतर साहाय्य पाने उपलब्ध आहेतच सोबतच विकिपीडिया:अपूर्ण लेख विकास या साहाय्य लेखाचेही अवलोकन करणे कदाचित आपणास आवडेल.
७) केवळ रमेश मंत्रीच नव्हे तर आपण इतरही लेखात सवडी नुसार लेखन करू शकता. अथवा आपणास रमेश मंत्री लेखात जाणत्या सदस्यांचे साहाय्य हवे असल्यास विकिपीडिया:जाणते या पानावर सदस्य नावांची यादी उपलब्ध आहे. अर्थात मराठी विकिपीडियावर लिहित्या खासकरून परिच्छेद लेखन करणाऱ्या सदस्यांची बऱ्यापैकी कमतरता असल्यामुळे वेळोवेळी साहाय्य आणि मार्गदर्शन करणे सोईचे असेल. संपूर्ण लेखन इतर कुणी करून देत असेल तर आपणास तशी चावडी/इतर चर्चा वर तशी विनंती करून पहावी लागेल.
साहाय्य आणि शंका निरसना साठी अशाच मनमोकळे पणाने पुढेही संपर्कात रहावे. आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय वाचन आणि लेखन होत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:४०, ७ मे २०१४ (IST)Reply

रमेश मंत्री यांच्याविषयीची माहिती संपादन

नमस्कार,

आपणास ही माहिती वरील रूपरेषेत बसवून देणे कठीण किंवा वेळखाऊ वाटत असले तर तीच माहिती आपण चर्चा:रमेश मंत्री या पानावर नोंदवू शकता. तेथून योग्य व आवश्यक ती माहिती लेखात हलविण्यास इतर सदस्य खचितच मदत करतील.

अर्थात सदस्य माहितगार यांनी वर उद्धृत केलेल्या नियमांत बसणारे लेखन असल्यास चांगलेच परंतु नियमांना धास्तावून माहिती देण्यास विलंब करू नये हीच नम्र विनंती.

क.लो.अ.

अभय नातू (चर्चा) ०२:०६, ८ मे २०१४ (IST)Reply