जगदाळे घराणे" हे मुळचे धार येथील राजे पोकळे यांच्या घराण्याची शाखा होय.पोकळे घराण्यापासून जगदाळे,निंबाळकर आणि पवार हि घराणी निर्माण झाली. श्रीमंत जगदाळे , पोकळे घराणे ९६ कुळी मराठा घराणे आहे.हे घराणे १६५९ पासून मराठा साम्राज्यात म्हणजेच स्वराज्यात समाविष्ट झाले.पानिपत च्या युद्धात गाजवलेल्या भीम पराक्रमासाठी हे घराणे प्रसिद्ध आहे.

श्रीमंत सरदार जगदेवराव जगदाळे हे मसूर या शाखेचे मूळ पुरुष आहेत. जगदेवराव जगदाळे यांना चार पुत्र होते पैकी महादजी नाईक जगदाळे-देशमुख हे मसूर परगणा,आणि औन्ध परगणा ची देशमुखी आणि पाटीलकी पाहत होते. विठोजी नाईक जगदाळे (मोकसदार) हे पेडगाव. तर कुमाजीराव जगदाळे देशमुख हे कराड ची देशमुखीआणि आंबक ची पाटीलकी पाहत होते. तर त्यांचे एक बंधू रामराव(रामराउ) जगदाळे देशमुख हे शिरवडे चे पाटीलकी करीत होते.

पैकी आंबक शाखेतील जगदाळे देशमुख यांचा वाडा सध्या पिंगळी बुद्रुक या ठिकाणी पिंगळजाई(तुळजाभवानी) रक्षणार्थ व इनाम गावी स्थित आहे.