संपूर्ण नाव : घनश्याम वसंतराव पाटील

व्यवसाय : पत्रकारिता/ पुस्तक प्रकाशन

गेली 15 वर्षे पूर्णवेळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. साप्ताहिक ‘चपराक’ आणि मासिक ‘साहित्य चपराक’चे मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक. ‘चपराक प्रकाशन’ या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक, संचालक. महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा स्वतंत्र संपादक.

अनेक वाङमयीन व वैचारिक नियतकालिकातून सातत्याने लेखन. तसेच अनेक ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. ‘साहित्य चपराक’च्या दिवाळी अंकाला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त. ‘दखलपात्र’,  ‘झुळूक आणि झळा’ हे अग्रलेखांचे दोन संग्रह आणि ‘अक्षर ऐवज’ हे समीक्षा लेखांचे पुस्तक प्रकाशित. 

‘चपराक प्रकाशन’च्या माध्यमातून आजवर कथा, कविता, ललित, वैचारिक, अध्यात्म, चरित्र, आत्मचरित्र, बालसाहित्य आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तके प्रकाशित. नवोदित आणि प्रस्थापित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी ‘चपराक साहित्य महोत्सवा’चे आयोजन. दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात सहभाग. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ग्रंथ पारितोषिक स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम. विविध नियतकालिकातून स्तंभ लेखन. 

संपर्क : घनश्याम पाटील

‘चपराक प्रकाशन’, 617, शुक्रवार पेठ, शाहू गणपतीसमोर, शिवाजी रस्ता, पुणे 411 002

दूरध्वनी : 020 - 24460909/7057292092

संकेतस्थळ: http://www.chaprak.com