• विष्णु वामन शिरवाडकर*
  • (कुसुमाग्रज)*
  • मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक*
  • जन्मदिन - २७ फेब्रुवारी, १९१२*
  • मराठी भाषा दिवस*

विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्न असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

या मराठी दिनाचे औचित्य साधून जि.प.प्रा.शा. राजेशनगर ढोकी, (द्विशिक्षकी) वस्तीशाळा येथे "वंदनीय कुसुमाग्रज"लिखीतः "अक्षरबाग" या पुस्तकाचे वाचन घेण्यात आले.

"अक्षरबागचे" वैशिष्ट असे कि, *प्राथमिक स्तरावर शब्दोच्चार सुलभ व्हावेत.

  • मूल अक्षरलेखनाकडे सहजरित्या वळावे.
  • अक्षरमालिकेत प्रवेश अधिक सुकर व रंजकपणे होतो.
  • या "अक्षरबागेत" शिक्षणाबरोबर काही ओझरते संस्कारही विद्यार्थ्यांवर होतात.
  • या "अक्षरबागेतील" प्रत्येक पानावर एक अक्षर आहे.
  • त्याअक्षरावर आधारित छोट्या छोट्या कविता रचल्या आहेत.
*अक्षराची ओळख चित्रातून करुन दिली आहे. 
  • प्रत्येक अक्षरापासून तयार झालेले शब्द दिलेले आहेत.
  • प्रत्येक अक्षराचे स्वरचिन्हयुक्त लेखन दिलेले आहे.
  • तसेच विशेष म्हणजे प्रत्येक अक्षरानुसार थोर व्यक्ती, महत्त्वाची ठिकाणे यांची चित्ररुप माहिती दिलेली आहे.
  • जोडाक्षरांची ओळख करून दिली आहे.
  • अँ ,ऑ अशा स्वरांचा या "अक्षरबागेत" समावेश केलेला आहे.
  • च, झ, ज या अक्षरांच्या उच्चारानुसार उदाहरणे दिलेली आहेत.
  • अक्षर- अवयव देऊन मुलांना अक्षरलेखनाकडे प्रोत्साहित केले आहे.
  • "मागणे", "गाडी", "खेळ","फुले","वाघोबाची शाळा","लोठेबाबा", "भारत" अशा छोट्या काव्यरचना या "अक्षरबागेत" समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
  • या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देऊन "अक्षरबागचे" वाचन तालबद्धरित्या करुन घेता येते.
  1. या बरोबरच विद्यार्थ्यांच्या शब्दसंपत्तीत वाढ होण्यास मदत होईल .

धन्यवाद!!!

श्रीमती. थडवे एस. यु. प्रा.शा. राजेशनगर ढोकी. उस्मानाबाद. २७ फेब्रुवारी २०१७.