महेश भाऊसाहेब कडूस हे महाराष्ट्रातील कृषी पदवीधरांच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. २०१२ साली महेश कडूस आणि त्यांचे कृषी पदवीधर सहकारी यांनी मिळून कृषी पदवीधरांचे शैक्षणिक,सामाजिक,उद्योजकीय,प्रशासकीय प्रश्न सोडवण्यासाठी कृषी पदवीधर संघटना या संघटनेची स्थापना केली. अनेक वर्ष महाराष्ट्रात कृषी पदवीधरांचे प्रश्न सरकार ने बेदखल केल्याने होणार्या अन्यायाविरुद्ध महेश कडूस यांनी कृषी पदवीधराना संघटीत करून वेळोवेळी निवेदने,निदर्शने,आंदोलने याच्या माध्यमातून कृषी पदवीधरांचे प्रश्न सोडविले आहेत. वेळोवेळी कृषी पदाविधारांसमोर उपस्थित होणारे शैक्षणिक प्रश्न, शासनाचे चुकलेले धोरणात्मक निर्णय, कृषी पदवीधरांची बेरोजगारी, कृषी पदवीधरांचा दर्जा, कृषी क्षेत्रातील इतर तांत्रिक दृष्ट्या सक्षम नसलेल्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी केलेला विरोध,वेळोवेळी राजकीय सहभाग यासाठी कृषी पदवीधर संघटना नेहमी चर्चेत आहे.

वय्यक्तिक- महेश कडूस यांचा जन्म २१ एप्रिल १९८६ साली झाला. त्यांचे वडील भाऊसाहेब माधव कडूस हे कामगार होते व आई गृहिणी आहे. महेश कडूस यांचे बालपण पिंपरी चिंचवड शहरात गेले. महेश कडूस यांचे शालेय शिक्षण कॅम्प एजुकेशन सोसायटी या विद्यालयात पिंपरी चिंचवड येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण चंद्रपूर,कोल्हापूर व पुणे येथे झाले.महेश कडूस हे उत्तम चित्रकार आहेत. चित्रकार व्हायला आवडले असते असे त्यांचे म्हणणे आहे.पर्यटन आणि लेखन यात हि त्यांना आवड आहे.