मनोज ढिकले -----

विठोबाची वीट आहे मी, तुकयाचे गीत आहे मी, मराठी साहित्य ऊमलते जिथे जिथे तिथे हुन्दडणारा एक ऊनाड वारकरी आहे मी, अनादि अनंत मराठीचा पुत्र आहे मी, मराठी म्हणून जन्मलो... परमेश्वराचा आभारी आहे मी, मायमराठीचा इतका अभिमान आहे मला की, मराठीवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाचा आहे मी...! माझी भावना, मराठी...... माझी प्रतिक्षा, मराठी...... माझी प्रतिभा, मराठी...... माझं विश्व, मराठी...... माझं स्वत्व, मराठी...... माझं ह्रदय, मराठी...... माझं मनही, मराठी...... माझी निर्मळता, मराठी...... माझी रसिकता, मराठी...... माझं दैवत, मराठी...... माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी.... माझं प्रेम, मराठी...... माझा श्वास, मराठी...... माझा हळवेपणा, मराठी...... माझे शब्द, मराठी...... मराठी...... मी मराठी मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे.