श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१६

श्रीलंका क्रिकेट संघाने ८ मे पासून ५ जुलै २०१६ पर्यंत इंग्लंडचा दौरा केला. ह्या दौऱ्यावर इंग्लंडविरूद्ध ३-कसोटी सामन्यांनंतर, ५-एकदिवसीय आणि एका टी२० सामन्याचे आयोजन केले गेले होते. त्याशिवाय कसोटी मालिकेअगोदर एसेक्स आणि लीस्टरशायरविरूद्ध प्रथम-श्रेणी सामन्यांचाही समावेश होता. याचबरोबर एकदिवसीय मालिकेआधी आयर्लंडविरूद्ध २-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले होते.[१]

पहिले दोन प्रथम श्रेणी सामने अनिर्णित राखल्यानंतर, श्रीलंकेला कसोटी मालिकेत २-० असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आयर्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेने २-० असा विजय मिळवला. त्यानंतर इंग्लंडने एकदिवसीय मालिका ३-० आणि एकमेव टी२० सामना सुद्धा जिंकला.

एप्रिल २०१६, मध्ये इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने, मालिकेत गुण-पद्धत वापरण्याचा प्रस्ताव ठेवला, आणि दोन्ही संघांनी त्यासाठी सहमती दर्शवली.[२][३] त्यानंतर, गुण पद्धतीला सुपर सिरीज असे नाव दिले गेले आणि ह्या आणि इंग्लंडच्या पाकिस्तान विरूद्धच्या मालिकेसाठी मान्यता दिली गेली.[४] कसोटी मध्ये विजेत्या संघाला ४ गुण दिले जातील, तर एकदिवसीय आणि टी२० सामन्यासाठी २-गुण दिले जातील. सर्व जमेस धरून चषक दिला जाणार नसला तरी £25,000चे पारितोषिक सर्व खेळाडूंमध्ये विभागुण देण्यात येइल.[४]

इंग्लंड दौरा संपादन

श्रीलंकेचा इंग्लंड दौरा २०१६
 
इंग्लंड
 
श्रीलंका
तारीख १९ मे – ५ जुलै २०१६
संघनायक अलास्टेर कुक (कसोटी)
आयॉन मॉर्गन (ए.दि., टी२०)
अँजेलो मॅथ्यूज
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा जॉनी बेरस्टो (३८७) कुशल सिल्वा (१९३)
सर्वाधिक बळी जेम्स अँडरसन (२१) नुवान प्रदीप (१०)
मालिकावीर जॉनी बेरस्टो (इं) व कुशल सिल्वा (श्री)
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा जेसन रॉय (३१६) दिनेश चंदिमल (२६७)
सर्वाधिक बळी डेव्हिड विली (१०)
लियाम प्लंकेट (१०)
सुरंगा लकमल (५)
नुवान प्रदीप (५)
मालिकावीर जेसन रॉय (इं)
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा जोस बटलर (७३) दनुष्का गुणतिलके (२६)
सर्वाधिक बळी लियाम डॉसन (३) अँजेलो मॅथ्यूज (२)
सुपर सिरीज गुण
इंग्लंड २०, श्रीलंका ४

खेळाडू संपादन

कसोटी एकदिवसीय सामने टी-२०इ
  इंग्लंड   श्रीलंका   इंग्लंड   श्रीलंका   इंग्लंड   श्रीलंका

सराव सामने संपादन

तीन दिवसीयः एसेक्स विरुद्ध श्रीलंकन संपादन

८–१० मे २०१६
११:००
धावफलक
वि
२५४ (६३ षटके)
कुशल मेंडिस ६६ (१०६)
आरोन बिअर्ड ४/६२ (१६ षटके)
४१२/४घो (१०० षटके)
जैक मिकेलबर्ग १०९ (१८८)
धम्मिका प्रसाद २/७८ (१७.३ षटके)
४२/२ (१३ षटके)
दिमत करुणारत्ने १६* (३२)
मॅट डिक्सन १/१७ (४ षटके)
  • नाणेफेक: श्रीलंकन, फलंदाजी
  • पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द.
  • आरोन बिअर्डचे (एसेक्स) प्रथम श्रेणी पदार्पण


तीन दिवसीयः लीस्टरशायर विरुद्ध श्रीलंकन संपादन

१३-१५ मे २०१६
११:००
धावफलक
वि
३६७ (९७.१ षटके)
दासुन शनाका ११२ (१३२)
रॉब सायर २/४१ (१२ षटके)
३७५/५घो (१०० षटके)
मायकल बर्गेस ९८ (१२४)
रंगना हेराथ २/३९ (२४ षटके)
२००/४घो (५०.२ षटके)
दिमत करुणारत्ने १०० (१३४)
रॉबर्ट टेलर १/२९ (११ षटके)
सामना अनिर्णित
ग्रेस रोड, लीसेस्टर
पंच: निक कुक (इं) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
  • नाणेफेक: श्रीलंकन, फलंदाजी


कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

१९–२३ मे २०१६
११:००
धावफलक
वि
२९८ (९०.३ षटके)
जॉनी बेअरस्टो १४० (१८३)
दासुन शनाका ३/४६ (१३ षटके)
९१ (३६.४ षटके)
अँजेलो मॅथ्यूज ३४ (६२)
जेम्स अँडरसन ५/१६ (११.४ षटके)
११९ (फॉलो-ऑन) (३५.२ षटके)
कुशल मेंडीस ५३ (६८)
जेम्स अँडरसन ५/२९ (१३.३ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ८८ धावांनी विजयी
हेडिंग्ले, लीड्स
पंच: अलिम दर (पा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: जॉनी बेअरस्टो (इं)
  • नाणेफेक: श्रीलंका, गोलंदाजी.
  • १ल्या दिवशी पावसामुळे अवघ्या ५३ षटकांचा खेळ होऊ शकला.
  • २ऱ्या दिवशी अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे खेळ लवकर संपवण्यात आला.
  • ३ऱ्या दिवशी पावसामुळे जेवणाआधी खेळ थांबला आणि १५:३० वाजता पुन्हा सुरू झाला.
  • कसोटी पदार्पण: जेम्स विन्स (इं) आणि दासुन शनाका (श्री).
  • जेम्स अँडरसनची ४५ धावांत १० बळी ही श्रीलंकेविरूद्ध इंग्लंडच्या गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे.
  • गुण: इंग्लंड - ४, श्रीलंका - ०


२री कसोटी संपादन

२७-३१ मे २०१६
११:००
धावफलक
वि
४९८/९घो (१३२ षटके)
मोईन अली १५५*(२०७)
नुवान प्रदीप ४/१०७ (३३ षटके)
१०१ (४३.३ षटके)
कुशल मेंडिस ३५ (६२)
स्टुअर्ट ब्रॉड ४/४० (१३ षटके)
८०/१ (२३.२ षटके)
अलास्टेर कुक ४७* (६५)
मिलिंदा सिरिवर्धना १/३७ (७.२ षटके)
४७५ (फॉलो-ऑन) (१२८.२ षटके)
दिनेश चंदिमल १२६ (२०७)
जेम्स अँडरसन ५/५८ (२७ षटके)
इंग्लंड ९ गडी राखून विजयी
रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ले-स्ट्रीट
पंच: अलिम दर (पा) आणि एस. रवी (भा)
सामनावीर: जेम्स अँडरसन (इं)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
  • रंगना हेराथचे ३०० कसोटी बळी पूर्ण.
  • जेम्स अँडरसनचे ४५० कसोटी बळी पूर्ण.
  • अलास्टेर कुक हा कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा जगातील सर्वात लहान आणि इंग्लंडचा पहिलाच फलंदाज.
  • ४थ्या दिवशी दुपारच्या सत्रानंतर पंच अलिम दर यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्या जागी रॉड टकर यांनी पंच म्हणून काम पाहिले, ज्यांच्या जागी डेव्हिड मिल्न्स यांनी तिसऱ्या पंचाची कामगिरी पार पाडली.
  • गुण: इंग्लंड - ४, श्रीलंका - ०


३री कसोटी संपादन

९–१३ जून २०१६
धावफलक
वि
४१६ (१२८.४ षटके)
जॉनी बेअरस्टॉ १६७* (२३२)
रंगना हेराथ ४/८१ (३६ षटके)
२८८ (९५.१ षटके)
कुशल सिल्वा ७९ (१५२)
ख्रिस वोक्स ३/३१ (१७.१ षटके)
२३३/७घो (७१ षटके)
ॲलेक्स हेल्स ९४ (१७९)
नुवान प्रदिप ३/३७ (१५ षटके)
७८/१ (२४.२ षटके)
दिमत करूणारत्ने ३७* (६६)
जेम्स अँडरसन १/२७ (९ षटके)
सामना अनिर्णित
लॉर्ड्स, लंडन
पंच: एस. रवी (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: जॉनी बेअरस्टॉ (इं)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
  • ४थ्या दिवशी पावसामुळे खेळ १४:४० वाजता सुरू करण्यात आला तर ५व्या दिवशी फक्त १२.२ षटकांचा खेळ होऊ शकला.
  • गुण: इंग्लंड - २, श्रीलंका - २


एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

२१ जून २०१६
१४:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
२८६/९ (५० षटके)
वि
  इंग्लंड
२८६/८ (५० षटके)
अँजेलो मॅथ्यूज ७३ (१०९)
ख्रिस वोग्स २/५६ (१० षटके)
डेव्हिड विली २/५६ (१० षटके)
ख्रिस वोग्स ९५* (९२)
अँजेलो मॅथ्यूज २/२२ (६ षटके)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • ख्रिस वोग्सच्या नाबाद ९५ ह्या ८व्या क्रमांकावरील फलंदाजातर्फे एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रम.
  • गुण: इंग्लंड - १, श्रीलंका - १


२रा सामना संपादन

२४ जून २०१६
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
२५४/७ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२५६/० (३४.१ षटके)
उपुल तरंगा ५३* (४९)
आदिल रशीद २/३४ (१० षटके)
ॲलेक्स हेल्स १३३* (११०)
इंग्लंड १० गडी व ९५ चेंडू राखून विजयी
एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
पंच: मायकल गॉफ (इं) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: जासन रॉय (इं)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
  • अलेक्स हेल्स आणि जासन रॉय दरम्यान इंग्लंडतर्फे १ल्या तसेच कोणत्याही गड्यासाठी सर्वोत्तम भागीदारी[५].
  • इंग्लंडची श्रीलंकेविरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिलीच २०० धावांची भागीदारी.
  • १० गडी राखून मिळवलेल्या विजयात ही दुसऱ्या डावातील सर्वोत्तम धावसंख्या.[५]
  • अलेक्स हेल्स च्या १३३* धावा ह्या इंग्लंडतर्फे श्रीलंकेविरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जास्त वैयक्तिक धावा[६].
  • गुण: इंग्लंड - २, श्रीलंका - ०.


३रा सामना संपादन

२६ जून २०१६
१०:३०
धावफलक
श्रीलंका  
२४८/९ (५० षटके)
वि
  इंग्लंड
१६/१ (४ षटके)
दिनेश चंदिमल ६२ (७७)
क्रिस वोक्स ३/३४ (१० षटके)
जो रूट ११* (१६)
सुरंगा लकमल १/८ (२ षटके)
सामना अनिर्णित
काउंटी मैदान, ब्रिस्टॉल
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि टिम रॉबिन्सन (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • इंग्लंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना थांबण्यात आला आणि पुढचा खेळ होणे शक्य नसल्याने रद्द करण्यात आला.
  • इंग्लंड आणि श्रीलंकेदरम्यानचा पावसामुळे रद्द करण्यात आलेला पहिलाच एकदिवसीय सामना.
  • गुण: इंग्लंड - १, श्रीलंका - १


४था सामना संपादन

२९ जून २०१६
१३:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
३०५/५ (४२ षटके)
वि
  इंग्लंड
३०९/४ (४०.१ षटके)
कुशल मेंडिस ७७ (६४)
आदिल रशीद २/५७ (९ षटके)
जासन रॉय १६२ (११८)
नुवान प्रदीप २/७८ (९ षटके)
इंग्लंड ६ गडी व ११ चेंडू राखून विजयी (ड/ल पद्धत)
द ओव्हल, लंडन
पंच: रॉब बेली (इं) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: जासन रॉय (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • श्रीलंकेच्या डावादरम्यान १८.१ षटकांनंतर आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ४२ षटकांचा करण्यात आला आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ४२ षटकांमध्ये ३०८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • जासन रॉय हा इंग्लंडतर्फे दुसऱ्या डावात तसेच ओव्हल मैदानावर सर्वाधिक धावा करणारारा फलंदाज (१६३ धावा).
  • एकदिवसीय इतिहासातील इंग्लंडमध्ये यशस्वी पाठलाग केली गेलेली ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या होय.
  • गुण: इंग्लंड - २, श्रीलंका - ०.


५वा सामना संपादन

२ जुलै २०१६
१०:३०
धावफलक
इंग्लंड  
३२४/७ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२०२ (४२.४ षटके)
ज्यो रूट ९३ (१०६)
दनुष्क गुणतिलक ३/४८ (१० षटके)
दनुष्क गुणतिलक ४८ (४५)
डेव्हिड विली ४/३४ (८.४ षटके)
इंग्लंड १२२ धावांनी विजयी
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: जोस बटलर (इं)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: चंमिडा बंदरा (श्री)
  • श्रीलंकेतर्फे एकदिवसीय क्रिकेट मध्ये चंमिडा बंदरा हा पदार्पणात सर्वाधिक धावा (८३) देणारा गोलंदाज ठरला.
  • गुण: इंग्लंड - २, श्रीलंका - ०


टी-२० मालिका संपादन

एकमेव टी-२० सामना संपादन

५ जुलै २०१६
१८:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१४० (२० षटके)
वि
  इंग्लंड
१४४/२ (१७.३ षटके)
जोस बटलर ७३* (४९)
अँजेलो मॅथ्यूज २/२७ (४ षटके)
इंग्लंड ८ गडी व १५ चेंडू राखून विजयी
रोझ बाऊल, साउथँप्टन
पंच: रॉब बेली (इं) आणि मायकल गॉफ (इं)
सामनावीर: जोस बटलर (इं)


आयर्लंड दौरा संपादन

श्रीलंकेचा आयर्लंड दौरा 2016
 
आयर्लंड
 
श्रीलंका
तारीख १६ जून – १८ जून २०१६
संघनायक विल्यम पोर्टरफिल्ड अँजेलो मॅथ्यूज
एकदिवसीय मालिका
निकाल श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा विल्यम पोर्टरफिल्ड (८१) कुशल परेरा (१६७)
सर्वाधिक बळी बॅरी मॅककार्थी (४)
टिम मुर्तघ (४)
दासुन शनाका (६)
मालिकावीर दासुन शनाका (श्री)

खेळाडू संपादन

एकदिवसीय सामने
  आयर्लंड   श्रीलंका

एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

१६ जून २०१६
१०:४५
धावफलक
श्रीलंका  
३०३/७ (५० षटके)
वि
  आयर्लंड
२१६ (४०.४ षटके)
दिनेश चंदिमल १०२* (१०९)
बॉयड रन्किन २/४५ (१० षटके)
श्रीलंका ७६ धावांनी विजयी (डकवर्थ लुईस पद्धत)
मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: मार्क हॉथॉर्न (आ) आणि पॉल राफेल (ऑ)


२रा सामना संपादन

१८ जून २०१६
१०:४५
धावफलक
श्रीलंका  
३७७/८ (५० षटके)
वि
  आयर्लंड
२४१ (४५ षटके)
कुशल परेरा १३५ (१२८)
टिम मुर्तग ३/६६ (१०)
  • नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी


संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "इसीबीतर्फे २०१६ आंतरराष्ट्रीय उन्हाळी मोसमाच्या तारखांची घोषणा".
  2. ^ "इसीबी तर्फे गुण-आधारीत पद्धत श्रीलंका मालिकेसाठी वापरण्याचा मुद्दा उपस्थित" (इंग्रजी भाषेत). १७ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "पाकिस्तान आणि श्रीलंकेची इंग्लंड दौर्‍यासाठी गुण पद्धतीला सहमती" (इंग्रजी भाषेत). ४ मे २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ a b "इंग्लंड वि श्रीलंका: 'सुपर सिरीज' मध्ये विविध प्रकारच्या क्रिकेटसाठी गुण दिले जाणार" (इंग्रजी भाषेत). १९ मे २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ a b "हेल्स आणि रॉयच्या विक्रमी भागीदारीने इंग्लंडचा १० गड्यांनी विजय" (इंग्रजी भाषेत).
  6. ^ "इंग्लंड / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / सर्वात जास्त धावा" (इंग्रजी भाषेत). २५ जून २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे संपादन

मालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो