भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१

भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने एकमेव महिला कसोटी सामना, तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जून-जुलै २०२१ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. भारतीय महिला संघाने २०१४ नंतर प्रथमच महिला कसोटी सामना खेळला. जागतिक महिला दिनाच्या दिवशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचीव जय शाह यांनी भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यात एकमेव महिला कसोटी खेळणार असल्याने जाहीर केले. एप्रिल २०२१ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.

भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१
इंग्लंड महिला
भारत महिला
तारीख १६ जून – १५ जुलै २०२१
संघनायक हेदर नाइट मिताली राज (म.कसोटी, म.ए.दि.)
हरमनप्रीत कौर (म.ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावा हेदर नाइट (९५) शफाली वर्मा (१५९)
सर्वाधिक बळी सोफी एसलस्टोन (८) स्नेह राणा (४)
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा नॅटली सायव्हर (१४२) मिताली राज (२०६)
सर्वाधिक बळी सोफी एसलस्टोन (८) झुलन गोस्वामी (३)
पूनम यादव (३)
दीप्ती शर्मा (३)
मालिकावीर सोफी एसलस्टोन (इंग्लंड)
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा डॅनियेल वायट (१२३) स्म्रिती मंधाना (११९)
सर्वाधिक बळी नॅटली सायव्हर (३)
सोफी एसलस्टोन (३)
कॅथेरिन ब्रंट (३)
पूनम यादव (३)
शिखा पांडे (३)
मालिकावीर नॅटली सायव्हर (इंग्लंड)
Series points
इंग्लंड महिला १०, भारत महिला ६

संपूर्ण दौरा हा गुण पद्धतीने खेळविला गेला. कसोटीत विजय झाल्यास ४ गुण, कसोटी अनिर्णित सुटल्यास २ गुण तर मर्यादित षटकांच्या सामन्यातल्या विजयांसाठी २ गुण अशी गुणांची विभागणी केली गेली.

एकमेव महिला कसोटी सामना अनिर्णित सुटला. सन १९९९ मध्ये अंजू जैन आणि चंद्रकांता यांनी भारतातर्फे पहिल्या गड्यासाठी रचलेल्या १३२ धावांच्या भागीदारीचा विक्रम शफाली वर्मा आणि स्म्रिती मंधाना यांनी १५८ धावांची सलामी भागीदारी रचत मोडला. इंग्लंडने भारतावर फॉलो-ऑन लादून देखील दुसऱ्या डावात स्नेह राणा, दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा यांच्या संयमी फलंदाजीमुळे भारताने डावाच्या फरकाने पराभव टाळत सामना अनिर्णित ठेवला. भारताची इंग्लंडमध्ये एकही महिला कसोटी सामना न हरण्याची परंपरा कायम राहिली.

इंग्लंडने पहिला एकदिवसीय सामना ८ गडी राखून जिंकत महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय प्रकारात मायदेशात १००वा विजय नोंदवला. दुसरा सामना देखील ५ गडी राखून जिंकत इंग्लंडने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. भारताने तिसरा एकदिवसीय सामना ४ गडी राखून जिंकला. इंग्लंडने महिला एकदिवसीय मालिकेत २-१ ने विजय संपादन केला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारताची कर्णधार मिताली राज हिने इंग्लंडच्या शार्लट एडवर्ड्सचा महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील १०,२७३ धावांचा विक्रम मोडत महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी आघाडीची क्रिकेट खेळाडू ठरली.

इंग्लंड महिलांनी ट्वेंटी२० मालिकेत २-१ असा विजय मिळवला आणि गुण पद्धतीनुसार संपूर्ण दौरा १०-६ अश्या फरकाने जिंकला.

महिला कसोटी मालिका संपादन

एकमेव महिला कसोटी संपादन

१६-१९ जून २०२१
धावफलक
वि
३९६/९घो (१२१.२ षटके)
हेदर नाइट ९५ (१७५)
स्नेह राणा ४/१३१ (३९.२ षटके)
२३१ (८१.२ षटके)
शफाली वर्मा ९६ (१५२)
सोफी एसलस्टोन ४/८८ (२६ षटके)
३४४/८ (१२१ षटके)(फॉ/ऑ)
स्नेह राणा ८०* (१५४)
सोफी एसलस्टोन ४/११८ (३८ षटके)
सामना अनिर्णित.
काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: सु रेडफर्न (इं) आणि क्रिस वॅट्स (इं)
सामनावीर: शफाली वर्मा (भारत)


महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

२७ जून २०२१
१०:३०
धावफलक
भारत  
२०१/८ (५० षटके)
वि
  इंग्लंड
२०२/२ (३४.५ षटके)
मिताली राज ७२ (१०८)
सोफी एसलस्टोन ३/४० (१० षटके)
टॅमी बोमाँट ८७* (८७)
झुलन गोस्वामी १/२५ (६ षटके)
इंग्लंड महिला ८ गडी राखून विजयी.
काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: ग्रॅहाम लॉईड (इं) आणि सु रेडफर्न (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • सोफिया डंकली (इं) आणि शफाली वर्मा (भा) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • गुण : इंग्लंड महिला - २, भारत महिला - ०


२रा सामना संपादन

३० जून २०२१
१४:०० (दि/रा)
धावफलक
भारत  
२२१ (५० षटके)
वि
  इंग्लंड
२२५/५ (४७.३ षटके)
मिताली राज ५९ (९२)
कॅथरिन क्रॉस ५/३४ (१० षटके)
सोफिया डंकली ७३* (८१)
पूनम यादव २/६३ (१० षटके)
इंग्लंड महिला ५ गडी राखून विजयी.
काउंटी मैदान, टाँटन
पंच: नायजेल लाँग (इं) आणि रसेल वॉरेन (इं)
सामनावीर: कॅथरिन क्रॉस (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • गुण : इंग्लंड महिला - २, भारत महिला - ०.


३रा सामना संपादन

३ जुलै २०२१
१०:३०
धावफलक
इंग्लंड  
२१९ (४७ षटके)
वि
  भारत
२२०/६ (४६.३ षटके)
नॅटली सायव्हर ४९ (५९)
दीप्ती शर्मा ३/४७ (१० षटके)
मिताली राज ७५* (८६)
सोफी एसलस्टोन २/३६ (१० षटके)
भारत महिला ४ गडी राखून विजयी.
न्यू रोड, वॉरसेस्टर
पंच: नायजेल लाँग (इं) आणि रसेल वॉरेन (इं)
सामनावीर: मिताली राज (भारत)
  • नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला.
  • गुण : इंग्लंड महिला - २, भारत महिला - ०.


महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

९ जुलै २०२१
१८:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१७७/७ (२० षटके)
वि
  भारत
५४/३ (८.४ षटके)
नॅटली सायव्हर ५५ (२७)
शिखा पांडे ३/२२ (४ षटके)
इंग्लंड महिला १८ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
काउंटी मैदान, नॉर्थम्पटन
पंच: इयान ब्लॅकवेल (इं) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: नॅटली सायव्हर (इंग्लंड)
  • नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे भारताला ८.४ षटकांमध्ये ७३ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
  • गुण : इंग्लंड महिला - २, भारत महिला - ०.


२रा सामना संपादन

११ जुलै २०२१
१४:३०
धावफलक
भारत  
१४८/४ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१४०/८ (२० षटके)
टॅमी बोमाँट ५९ (५०)
पूनम यादव २/१७ (४ षटके)
भारत महिला ८ धावांनी विजयी.
काउंटी मैदान, होव
पंच: इयान ब्लॅकवेल (इं) आणि पॉल बाल्डवीन (इं)
सामनावीर: दीप्ती शर्मा (भारत)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • गुण : भारत महिला - २, इंग्लंड महिला - ०.


३रा सामना संपादन

१४ जुलै २०२१
१८:३० (दि/रा)
धावफलक
भारत  
१५३/६ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१५४/२ (१८.४ षटके)
डॅनियेल वायट ८९* (५६)
स्नेह राणा १/२७ (३ षटके)
इंग्लंड महिला ८ गडी राखून विजयी.
काउंटी मैदान, चेम्सफोर्ड
पंच: सु रेडफर्न (इं) आणि टिम रॉबिन्सन (इं)
सामनावीर: डॅनियेल वायट (इंग्लंड)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • गुण : इंग्लंड महिला - २, भारत महिला - ०.