बंडारू दत्तात्रेय

भारतीय राजकारणी

बंडारू दत्तात्रेय (जन्म १२ जून १९४७) हे २०२१ पासून हरियाणा राज्याचे विद्यमान राज्यपाल हेत.. हे सिकंदराबाद मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून आले होते.

श्री बंडारू दत्तात्रय

विद्यमान
पदग्रहण
७ जुलै २०२१
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर
मागील सत्यदेव नारायण आर्य

कार्यकाळ
११ सप्टेंबर २०१९ – ७ जुलै २०२१
मागील कलराज मिश्रा
पुढील राजेंद्र आर्लेकर

कामगार आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार).
कार्यकाळ
९ नोव्हेंबर २०१४ – १ सप्टेंबर २०१७
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील नरेंद्रसिंग तोमर
पुढील संतोष गंगवार

कार्यकाळ
१६ मे २०१४ – २३ मे २०१९
मागील अंजनकुमार यादव
पुढील गंगापुरम किशन रेड्डी
मतदारसंघ सिकंदराबाद
कार्यकाळ
१० मार्च १९९८ – १६ मे २००४
मागील प्पी. व्ही. राजेश्वर राव
पुढील अंजनकुमार यादव
मतदारसंघ सिकंदराबाद
कार्यकाळ
२० जून १९९१ – १० मे १९९६
मागील टंगतुरी मानेम्मा
पुढील पी. व्ही. राजेश्वर राव
मतदारसंघ सिकंदराबाद

जन्म १२ मे, १९४७ (1947-05-12) (वय: ७६)
हैदराबाद (तेलंगणा)
राष्ट्रीयत्व भारतीय भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी श्रीमती. वसंताा
शिक्षण बी.एस्सी. उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद (तेलंगणा) येथे शिक्षण.
धर्म हिंदू

राजकीय कारकीर्द संपादन

  • १९६८: संघ प्रचारक म्हणून सुरुवात केली
  • १९७४: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विभाग प्रचारक
  • १९७५: संयुक्त संयोजक - लोक संघर्ष समिती (आणीबाणीच्या काळात)
  • १९७६-७७: आणीबाणीच्या काळात मिसा अंतर्गत अटक
  • १९७८: चक्रीवादळ मदत समितीचे संयुक्त सचिव - आंध्र प्रदेश (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ), दिवेसीमा आंध्र प्रदेश मध्ये चक्रीवादळग्रस्तांसाठी पुनर्वसन आणि निवासस्थान हाती घेतले
  • १९७९:प्रमुख-सेवा भारती आंध्र प्रदेश
  • १९८०: भाजपमध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्ष (B.J.P.), आंध्र प्रदेशचे सचिव म्हणून नियुक्त केले.
  • १९८१-८९: जनरल सेक्रेटरी, भाजप, आंध्र प्रदेश
  • १९९१: १०व्या लोकसभेसाठी निवडून आले, सदस्य, लोकलेखा समिती सदस्य, अनुसूचित जाती, जमाती आणि अल्पसंख्याकांच्या कल्याण समिती
  • १९९६-९८: अध्यक्ष, बीजेपी, आंध्र प्रदेश
  • १९९८: १२व्या लोकसभेसाठी पुन्हा निवडून आले (दुसरी वेळ)
  • १९९८-९९: केंद्रीय राज्यमंत्री, शहरी विकास
  • १९९९: १३व्या लोकसभेसाठी पुन्हा निवडून आले (३री वेळ)
  • १३ ऑक्टोबर १९९९- १३ जून २०००: केंद्रीय राज्यमंत्री, शहरी विकास
  • १४ जून २०००- ३० जून २००२: केंद्रीय राज्यमंत्री, शहरी विकास आणि गरीबी निर्मूलन
  • १ जुलै २००२-७ सप्टेंबर २००३: केंद्रीय राज्यमंत्री, रेल्वे मंत्रालय
  • ८ सप्टेंबर २००३-मे २००४: केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), नगरविकास आणि दारिद्र्य निर्मूलन मंत्री
  • २००४-२००६: राष्ट्रीय सचिव, भारतीय जनता पार्टी (भाजप)
  • २००६-२००९: अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी (भाजप), आंध्र प्रदेश
  • २००९-२०१३: राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, भारतीय जनता पक्ष (भाजप)
  • २०१३-२०१४: राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष (भाजप) सदस्य, राष्ट्रीय जाहीरनामा समिती, भारतीय जनता पार्टी (भाजप)
  • मे, २०१४: १६व्या लोकसभेच्या (चौथी वेळ) सदस्य, रेल्वेवरील स्थायी समितीसाठी पुन्हा निवडून आले.
  • १ सप्टेंबर २०१४-९ नोव्हेंबर २०१४: सदस्य, रेल्वे स्थायी समिती
  • १२ सप्टेंबर २०१४-९ नोव्हेंबर २०१४: अध्यक्ष, इतर मागासवर्गीय (OBC) कल्याणावरील संसदीय समिती
  • १५ सप्टेंबर २०१४-९ नोव्हेंबर २०१४: सदस्य, लोकसभेच्या सदस्यांसोबत प्रोटोकॉल नियमांचे उल्लंघन आणि सरकारी अधिकाऱ्यांचे अवमानकारक वर्तन यावरील समिती
  • ९ नोव्हेंबर २०१४-१ सप्टेंबर २०१७: केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), कामगार आणि रोजगार
  • १ सप्टेंबर २०१७: सदस्य, अर्थविषयक स्थायी समिती
  • १९ डिसेंबर २०१८: अध्यक्ष, संसद सदस्यांचे वेतन आणि भत्ते यावरील संयुक्त समिती
  • ११ सप्टेंबर, २०१९ - १४ जुलै २०२१: हिमाचल प्रदेशचे राज्यपाल
  • १५ जुलै २०२१: हरियाणाच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली

संदर्भ संपादन