हेपॅटायटिस-ए लस

(Hepatitis A vaccine या पानावरून पुनर्निर्देशित)

हेपॅटायटिस-ए लस ही एक अशी लस आहे, की जी हिेटायटिस ए रोगाला प्रतिबंधित करते.[१] हिचा परिणाम सुमारे ९५ टक्के प्रकरणांमध्ये प्रभावी आहे आणि कमीतकमी पंधरा वर्षे, आणि हा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या बहुधा संपूर्ण आयुष्यभरासाठी टिकतो..[२] जर लसीचे डोस दिले तर, एक वर्ष वयानंतर दोन डोस देण्याची शिफारस केली जाते. ही लस स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारे देतात.

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) बहुधा सार्वत्रिक लसीकरण करण्याची शिफारस करते.[१] जेथे हा आजार खूपच कमी प्रमाणात आहे, तेथे व्यापक लसीकरण करण्याची शिफारस केली जात नाही, कारण साधारणपणे वय लहान असतानाच लोक शरीरात हेपॅटायटिस रोगासंदर्भात प्रतिकारशक्ती विकसित करतात. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) जास्त जोखीम असलेल्या प्रौढ लोकांना आणि सर्व मुलांना लसीकरण करण्याची शिफारस करतात.[३]

हेपॅटायटिस-ए लसीचे तीव्र आनुषंगिक परिणाम फारच दुर्मिळ आहेत.[१] इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना सुमारे 15% मुले आणि अर्ध्या प्रौढांमध्ये होते. बहुतांश हेपॅटायटिटिस ए लसींमध्ये निष्क्रिय व्हायरस असतो, तर काहींमध्ये कमकुवत विषाणू असतो. गरोदरपणात किंवा दुर्बल प्रतिकारशक्ती असलेल्या कोणासाठीही कमकुवत विषाणूची शिफारस केली जात नाही. काही ठिकाणी हेपॅटायटिस ए लस ही एकतर हेपॅटायटिस बी लस किंवा टायफॉइडची लस यांच्याबरोबर एकत्रितपणे देतात.

हेपॅटायटिस ए ची पहिली लस सन १९९१मध्ये युरोपमध्ये आणि १९९५मध्ये अमेरिकेत मंजूर झाली.[४] ही लस जागतिक आरोग्य संघटनेच्या आवश्यक औषधांच्या सूचीमध्ये आहे, आणि ती आरोग्य यंत्रणेत आवश्यक असलेल्या सर्वात सुरक्षित आणि सर्वात प्रभावी औषधामध्ये समाविष्ट आहे.[५] अमेरिकेत हेपॅटायटिस ए लसीची किंमत ५० ते १०० अमेरिकन डॉलर इतकी आहे.[६]

  1. a b c "WHO position paper on hepatitis A vaccines – June 2012" (PDF). Wkly Epidemiol Rec. 87 (28/29): 261–76. 13 July 2012. PMID 22905367. Archived from the original (PDF) on 16 December 2015.
  2. ^ Ott JJ, Irving G, Wiersma ST (December 2012). "Long-term protective effects of hepatitis A vaccines. A systematic review". Vaccine. 31 (1): 3–11. doi:10.1016/j.vaccine.2012.04.104. PMID 22609026.
  3. ^ https://web.archive.org/web/20151210191218/http://www.cdc.gov/vaccines/vpd-vac/hepa/in-short-adult.htm#who. Archived from the original on 10 December 2015. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ Patravale, Vandana; Dandekar, Prajakta; Jain, Ratnesh (2012). Nanoparticulate drug delivery perspectives on the transition from laboratory to market (1. publ. ed.). Oxford: Woodhead Pub. p. 212. ISBN 9781908818195.
  5. ^ "World Health Organization model list of essential medicines: 21st list 2019". World Health Organization. 2019. Cite journal requires |journal= (सहाय्य)
  6. ^ Hamilton, Richart (2015). Tarascon Pocket Pharmacopoeia 2015 Deluxe Lab-Coat Edition. Jones & Bartlett Learning. p. 314. ISBN 9781284057560.