ॲलिस इन वंडरलँड
(ॲलिसेस ॲडव्हेंचर्स इन वंडरलँड या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲलिस इन वंडरलँड (अथवा ॲलिस इन वंडरलॅंड) ही इ.स. १८६५ मध्ये इंग्लिश लेखक चार्ल्स लुटविज डॉजसन यांनी लुईस कॅरोल या टोपणनावाने लिहिलेली कादंबरी आहे. या कादंबरीत एका लहान मुलीची गोष्ट सांगितली आहे, जी एका सशाच्या बिळात पडते व एका काल्पनिक जगात प्रवेश करते. या विश्वात अनेक चमत्कारिक, माणसांसारखे बोलणारे व वागणारे प्राणी राहत असत. तर्कशास्त्राशी खेळणारी ही कादंबरी आबालवृद्धांमध्ये प्रिय आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतरच्या अनेक साहित्यकृतींवर या कादंबरीचा प्रभाव पडला आहे.
ॲलिसेस ॲडव्हेंचर्स इन वंडरलॅंड | |
मूळ आवृत्तीचे मुखपृष्ठ (१८६५) | |
लेखक | लुईस कॅरोल |
भाषा | इंग्लिश |
देश | युनायटेड किंग्डम |
साहित्य प्रकार | कादंबरी |
प्रकाशन संस्था | मॅकमिलन पब्लिशर्स |
प्रथमावृत्ती | २६ नोव्हेंबर इ.स. १८६५ |
पुस्तकातील चित्रांचे चित्रकार | जॉन टेनिल |