ॲना कॉम्नेने
ॲना कॉम्नेने किंवा ॲना कॉम्नेना (१ डिसेंबर, १०८३:कॉन्स्टेन्टिनोपलचा भव्य महाल, बायझेन्टाइन साम्राज्य - ११५३:कॉन्स्टेन्टिनोपल) ही बायझेन्टाइन वैद्य, इतिहासलेखक आणि विदूषी होती.
ही बायझेन्टाईन सम्राट ॲलेक्सियोस पहिला आणि आयरीन डूकिनाची मुलगी होती. ॲना सगळ्यात मोठे अपत्य असूनही ॲलेक्सियोसने तिच्या लहान भावाला युवराज घोषित केले होते.
हिने आपल्या वडिलांच्या कारकिर्दीचा इतिहास ॲलेक्सियाड या ग्रंथात लिहून ठेवला आहे.