५ गेबिर्ग्स डिव्हिजन (वेह्रमाख्ट)
(५ माउंटन डिव्हिजन, जर्मनी या पानावरून पुनर्निर्देशित)
५ गेबिर्ग्स डिव्हिजन ही दुसऱ्या महायुद्धातील नाझी जर्मनीच्या सैन्याची डिव्हिजन होती. याची रचना ऑक्टोबर १९४०मध्ये १ गेबिर्ग्स डिव्हिजन आणि १०व्या पायदळ डिव्हिजनच्या तुकड्यांनिशी झाली. या डिव्हिजनने १९४१ च्या बाल्कन मोहीमेत भाग घेतला. यांतील मेरिटा मोहीम आणि मेर्कुर मोहीमांमध्ये या डिव्हिजनने लढाईत सक्रिय भाग घेतला.
एप्रिल १९४२मध्ये ही डिव्हिजन रशियावरील आक्रमणात सहभागी झाली व १९४३मध्ये इटलीमध्ये तैनात होती. महायुद्धाच्या शेवटपर्यंत आल्प्स पर्वतांमध्ये लढून शेवटी मे १९४५मध्ये या डिव्हिजनने अमेरिकेच्या सैन्यासमोर शरणागती पत्करली.