.३ मार्च इ.स.१७०० छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू... महाराणी ताराबाईंनी राज्य कारभार हाती घेतला... औरंग्याने शंभुराजांची अमानुष हत्या केली... आता मराठे घाबरतील,शक्तिहीन होतील आणि महाराष्ट्र आपल्याला सहज हस्तगत करता येईल असं त्याला वाटत होतं... पण घडलं भलतचं.... शंभुराजांचा मृत्यु मराठ्यांच्या अतिशय जिव्हारी लागला...राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठे औरन्गजेबाला टक्कर देवू लागले...दक्षिनेतील जिंजीच्या किल्ल्यावर राहून राजाराम महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले...

या काळात राजारामराजांना संताजी घोरपडे, धनाजी जाधव आशा रणधुरंधर सेनापति तसेच प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत अशा कारभारयांची साथ लाभली...मुघलांशी निर्णायक युद्ध जिंकने अशक्य होते... म्हणून राजारामांनी मुघलांनी मिळवलेला जो भाग मराठे जिंकतील तो भाग त्यांची जहागीर बनवण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार दिले... वेग-वेगळे मराठा सरदार जागो-जागी मुघल सैन्यावर आक्रमण करू लागले... संधी मिळताच त्यांचा पराभव करून रसद लुटू लागले... आपली पिछेहाट होताना दिसताच पसर होवू लागले.. मुघलंनी जिंजीला वेढा दिला...पण राजाराम महाराज पसार होवून विशालगडावर गेले... तेथून सातारा,कर्नाटक पुन्हा महाराष्ट्र अशा चकमकी होवू लागल्या..महाराष्ट्रात मुघलांना धुळ चारायची हेच एकमेव लक्ष्य मराठ्यांसमोर होते. त्यासाठी कोणताही मार्ग अवलंबायाला ते तयार होते.. त्यांना सर्वसामान्य जनतेचाही पाठिंबा होताच. शेतकरी दिवसा शेती करून रात्री सैनिक बनत होता..परन्तु, दुर्दैवाने महाराष्ट्राची पाठ सोडली नाही.. ३ मार्च रोजी सिंहगडावर मराठ्यांचा तिसरे छत्रपति राजाराम महाराज सिंहगडावर मरण पावले..निधन झाले तेंव्हा राजाराम महाराज ३० वर्षाचे होते.. त्यांच्या काळखंडातचs सिन्धुदुर्गावर शिवरायांचे मंदिर उभारन्यात आले.