२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पहिली फेरी गट अ
२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिली फेरी गट अचे सामने इथे नोंदीत आहेत. पहिल्या फेरीच्या अ गटात आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड्स आणि श्रीलंका हे चार संघ होते. अ गटात पहिल्या स्थानी राहिलेला संघ सुपर १२ मध्ये अ गटात तर दुसऱ्या स्थानी राहिलेला संघ सुपर १२ मध्ये ब गटात पात्र ठरतील.
पहिल्या सामन्यात आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फर याने हॅट्रीक घेतली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात हॅट्रीक घेणारा कर्टिस हा आयर्लंडचा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला. तसेच त्याने चौथ्या चेंडूवर देखील गडी बाद केला. त्यामुळे चार चेंडूत चार गडी बाद करणारा तो जगातला तिसरा क्रिकेट खेळाडू ठरला. चौथ्या सामन्यात आयर्लंडला हरवत श्रीलंकेने सुपर १२ मध्ये प्रवेश मिळवला. आयर्लंड आणि नामिबियामध्ये करो वा मरो सामन्यात आश्चर्यकारकपणे नामिबियाने आयर्लंडवर थरारक विजय मिळवत सुपर १२ फेरीत प्रवेश मिळवला.
गुणफलक
संपादनसंघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती | पात्र |
---|---|---|---|---|---|---|---|---|
श्रीलंका | ३ | ३ | ० | ० | ० | ६ | ३.७५४ | सुपर १२ मध्ये बढती |
नामिबिया | ३ | २ | १ | ० | ० | ४ | -०.५२३ | |
आयर्लंड | ३ | १ | २ | ० | ० | २ | -०.८५३ | बाद |
नेदरलँड्स | ३ | ० | ३ | ० | ० | ० | -२.४६० |
सामने
संपादनआयर्लंड वि नेदरलँड्स
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
श्रीलंका वि नामिबिया
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- श्रीलंका आणि नामिबिया मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- नामिबियाचा ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकातील पहिला वहिला सामना.
- श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नामिबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
नामिबिया वि नेदरलँड्स
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.
- नामिबियाचा ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यातील पहिला विजय.
- नामिबियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नेदरलँड्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- या सामन्याच्या निकालामुळे नेदरलँड्स स्पर्धेतून बाद.
श्रीलंका वि आयर्लंड
संपादनवि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
- या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका सुपर १२ साठी पात्र.
- ह्या विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीत पोचल्यामुळे श्रीलंका २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक साठी देखील पात्र ठरला.
नामिबिया वि आयर्लंड
संपादनवि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
- या सामन्याच्या निकालामुळे आयर्लंड स्पर्धेतून बाद तर या सामन्याच्या निकालामुळे नामिबिया सुपर १२ साठी पात्र.
- ह्या विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीत पोचल्यामुळे नामिबिया २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक साठी देखील पात्र ठरला.
श्रीलंका वि नेदरलँड्स
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.