दिवाळी अंक २०१६

(२०१६ सालचे दिवाळी अंक या पानावरून पुनर्निर्देशित)

सन १९०९ मध्ये मनोरंजन या मराठी मासिकाचा दिवाळीत जवळपास २०० पानांचा, एक रुपये किमतीचा जो अंक प्रसिद्ध झाला तो दिवाळी अंकांच्या परंपरेचा उगम समजला जातो. त्याचे संपादक होते का.र. मित्र. त्याआधी, सन १९०५ मध्ये बाळकृष्ण भागवत आणि देवधर या संपादकद्वयीने त्यांच्या मित्रोदय या मासिकाबाबत तसा प्रयोग केला होता, अशी नोंद आढळते. मात्र घसघशीत पृष्ठसंख्येचा, विविध गद्य व पद्य साहित्यप्रकारांना स्थान देणारा, आकर्षक रीतीने सादर झालेला व ती वार्षिक परंपरा पुढेही बऱ्यापैकी जपणारा पहिला दिवाळी अंक मनोरंजनचाच होता, एवढे उपलब्ध प्रसिद्ध माहितीवरून सांगता येते. सन १९०९ ते आज सन २०१६. हा कालावधी १०७ वर्षांचा.

मराठीत प्रसिद्ध होणाऱ्या ज्ञात दिवाळी अंकांचा आकडा अंदाजे साडेतीनशे आहे. त्याखेरीज केवळ जाहिरातींमधून कमाई करण्यासाठी निघणारे अंक तर गावगन्ना पैशाला पासरी आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या पुढाऱ्यांच्या, सहकारी साखर कारखान्यांच्या, पतपेढ्यांच्या, बँकांच्या, कुक्कुटपालन केंद्राच्या, दूधसंघांच्या, कारखान्यांच्या जाहिराती मिळवायच्या, गॉगलधारी युवा नेत्यांच्या चकचकीत छायाचित्रांनी पाने भरायची, त्यातून उरलेल्या जागेत स्थानिक हौशी साहित्यिकांनी प्रसवलेले साहित्य अंगचोरपणे बसवायचे, ही अशा अंकांची रीत असते. सहज शक्य झाले तरच दिवाळीच्या आसपास दिवाळी अंक प्रसिद्ध करायचा, अन्यथा नंतर जमेल तेव्हा, असा त्यांचा खाक्या असतो. त्यामुळे दिवाळी अंकाच्या विकासवाटचालीचा हिशेब मांडताना असे अंक लक्षातही न घेणे उत्तम. लक्षात घ्यायला हवेत ते मुख्य प्रवाहातील म्हणून गणले जाणारे अंक. या अशा २०१६ साली प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांची ही यादी -

  • अर्थशक्ती (संपादक : रमेश नार्वेकर)
  • असाही महाराष्ट्र (संपादक मंडळ : अमोल गवळी आणि अन्य मान्यवर, पाने : २००, किंमत- १५० रुपये)
  • आपला डाॅक्टर (संपादक : शीतल मोरे, पाने : १०४, किंमत- ८० रुपये)
  • आवाज (संपादक : भारतभूषण पाटकर, किंमत- २०० रुपये)
  • आश्लेषा (संपादक : अशोक तावडे आणि सुनील कर्णिक, किंमत : १५० रुपये)
  • आहुती (संपादक : गिरीश त्रिवेदी, किंमत- १५० रुपये)
  • उद्‌वेली ऑल दि बेस्ट (संपादिका : वैशाली मेहेत्रे, किंमत- १३० रुपये)
  • उद्योगश्री (संपादक : भीमाशंकर कठारे)
  • उद्योगिनी (संपादिका : मीनल मोहाडीकर, किंमत- ८० रुपये)
  • उद्योजक (संपादक : पी.पी. देशमुख)
  • ऋतुगंध (संपादक : सुनील पाटोळे, किंमत- ७० रुपये)
  • ऋतुरंग (संपादक : अरुण शेवते, किंमत- २०० रुपये)
  • कलाविष्कार (ई-अंक, संपादक : प्रथमेश सुरेश शिरसाट)
  • कान्हेरी (संपादक : रामकृष्ण जोगळेकर, किंमत- १०० रुपये)
  • कालनिर्णय (संपादक : )
  • किल्ला संपादक : रामनाथ आंबेरकर, किंमत- ३०० रुपये)
  • किस्त्रीम (संपादक : )
  • गंधाली (संपादक : डॉ. मधुकर वर्तक, किंमत- १८० रुपये)
  • ग्राहकहित (संपादक : सूर्यकांत पाठक,  किंमत- १०० रुपये)
  • चतुरंगी हास्य (संपादक : विवेक म्हेत्रे)
  • जिद्द (संपादक : सुनील राज, किंमत– ५० रुपये)
  • डिजिटल दिवाळी (ई-अंक) (संपादक : )
  • दक्षता (संपादक : यशवंत व्हटकर, किंमत- ८० रुपये)
  • दुर्गांच्या देशातून (संपादक : संदीप तापकीर, योगेश काळजे, किंमत- २०० रुपये)
  • धनंजय (संपादक : नीलिमा राजेंद्र कुलकर्णी, पाने : ३९२, किंमत- २०० रुपये)
  • नेटभारी ई दिवाळी अंक (संपादक : )
  • महाराष्ट्र टाइम्स (संपादक : )
  • मेहता मराठी ग्रंथजगत (संपादक : सुनील मेहता किंमत– १०० रुपये)
  • युगादेश (संपादक : लक्ष्मीकांत जोशी)
  • रामप्रहर (संपादक : मदन बडगुजर)
  • लीलाई (संपादक : पूजा रोकडे, किंमत- १५० रुपये)
  • लोकप्रभा (संपादक : )
  • लोकसत्ता (संपादक : गिरीश कुबेर, किंमत - १४०रुपये)
  • लोकसत्ता विदर्भरंग (किंमत - २० रुपये)
  • वयम् (मुख्य संपादक : शुभदा चौकर, किंमत- ११० रुपये)
  • शब्दरुची (संपादक : सुदेश हिंगलासपूरकर, किंमत- १५० रुपये)
  • शब्ददर्वळ (संपादक : बेडेकर, किंमत : १५० रुपये)
  • शब्दोत्सव (संपादक : अभिजीत जोंधळे)
  • दैनिक सकाळ (संपादक : )
  • संस्कृती
  • सामना (संपादक : उद्धव ठाकरे, किंमत- ८० रुपये)
  • साहित्य (संपादक : अशोक बेंडखळे, किंमत– १०० रुपये)
  • साहित्यआभा (संपादक : शारदा धुळप, किंमत- २०० रुपये)
  • साहित्य मैफल (संपादक : कुमार कदम, किंमत- ९० रुपये)
  • सृष्टिज्ञान (संपादक : राजीव विळेकर, किंमत १०० रुपये)
  • स्मार्ट उद्योजक (संपादक शैलेश राजपूत, किंमत- १५० रुपये)