१८५७ च्या उठावाचे स्वरूप
इ.स. १८५७ च्या या उठावाच्या स्वरूपाविषयी निरनिराळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी मते मांडली आहेत. ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणण्यात यश मिळविले असले तरी प्रारंभीच्या काळापासूनच कंपनीला भारतीयाचा विरोध सहन करावा लागत होता. इंग्रजांच्या वसाहतवादी धोरणामुळे व भारतीयाचे आर्थिक शोषण करण्याच्या त्यांच्या नीतीमुळे ब्रिटिशाविरुद्ध भारतीय समाजात असंतोष निर्माण झाला होता. या असंतोषातूनच ठीकठिकाणी बंड व उठाव घडून आले होते . तथापि , या उठावाना स्थानिक स्वरूप असल्याने हे उठाव इंग्र्जी सत्तेपुढे फार मोठे आव्हान उभे करू शकले नाहीत. इ.स. १८५७ च्या उठावाचे स्वरूप मात्र वेगळे व वैशिष्टपूर्ण होते . या उठावाची व्याप्ती मोठी असल्याने ब्रिटिशापुढे हा उठाव एक आव्हान ठरले. भारतातील इंग्रजी सत्ता नष्ट करण्याचा भारतीय जनतेने केलाला हा मोठ्या प्रमाणावरील एक प्रयत्न होता. या उठावाच्या रूपाने भारतीय समाजाच्या मनात इंग्र्जी सत्तेविषयी असलेला असंतोष उफाळून आला. हा उठाव अयशस्वी ठरला असला तरी भारतीय समाजमनात ब्रिटिश सत्तेविरुद्ध असलेल्या असंतोषाचे प्रगट झालेले ते एक रौद् स्वरूप होते. या उठावाच्या स्वरूपाविषयी इतिहासकारांनी पुढीलप्रमाणे वेगवेगळी मते मांडली आहेत.
१) ब्रिटिश इतिहासकारांच्या मते इ.स. १८५७चा उठाव म्हणजे ' शिपायांचे बंड ' होते . सर जाॅन लॉरेन्स, जॉन सिली , पी. इ. रॉबट॔स् या इंग्र्ज इतिहासकारांनी या उठावाला ' शिपायांचे बंड ' म्हणलेले आहे. त्यांच्या मते, या उठावामागे सैन्यातील काही असंतुष्ट शिपायांचा वैयक्तिक स्वार्थ होता. उठावामध्ये राष्ट्रभक्तीची भावना नव्हती. प्रा. न. र. फाटक या प्रसिद्ध भारतीय विचारवंतानेही या उठावाल, ' १८५७ची शिपाईगर्दी ' असे म्हणले आहे.