हॉपलाइट हे प्राचीन ग्रीक नगरराज्यांमधील नागरिक-सैनिक होते. प्रथमतः हॉपलाइट हे भालेदारी होत आणि फालंक्स फळीत राहून लढत. "हॉपलाइट" (ग्रीक: ὁπλίτης हॉपलाइटस; अ.व. ὁπλίται हॉपलिटाइ) हा शब्द सैनिक वापरतात अशी एक ढाल - "हॉपलॉन" (ὅπλον, अ.व. हॉपला ὅπλα), वरून बनलेला आहे,[] तथापि, "हॉपला" हा शब्द शस्त्र किंवा लढाईची जय्यत तयारी ह्या अर्थाने सुद्धा वापरला जाइ. नंतरच्या लिखाणांत, हॉपलाइट ही संज्ञा कुठल्याही शस्त्रधारी पायदळी सैनिकास वापरलेला आढळते.

संदर्भ

संपादन
  1. ^ Diodorus Siculus, 15.44.3 "hoi [men] proteron apo tôn aspidôn hoplitai kaloumenoi tote [de] apo tês peltês peltastai metônomasthêsan"