अमेरिकेतील टेक्सास मधील गल्वेस्टोन नावाच्या शहरातील हॉटेल गल्वेझ हे ऐतिहासिक हॉटेल आहे. हॉटेल गल्वेझच्या वास्तूचे नाव गल्वेझ होते की जे महाना बर्नार्डो दी गल्वेझ वाय माद्रिद कौट आफ गल्वेझ यांच्या सन्माना खातर ठेवलेले होते. तसेच या शहरालाही गल्वेझ हेच नाव दिलेले आहे.

दि. 4 एप्रिल 1979 रोजी या वास्तूची पुरातत्त्व विभागाच्या राष्ट्रीय नोंद रजिस्टर वर नोंद केलेली आहे. अमेरिकेच्या ऐतिहासिक हॉटेल पैकी हॉटेल गल्वेझ आणि स्पा हे व्यंधम ग्रँड हॉटेल अमेरिकेच्या ऐतिहासिक हॉटेल मधील एक आहे की जे एक सरकारी राष्ट्रीय कार्यक्रमात अधिकारवाणीने कार्यक्रम करणारे आहे.[१]

इतिहास संपादन

 
गल्वेझ हॉटेल कीर्चा १९११

अमेरिकेचे टेक्सास मधील गल्वेस्टोन शहरात एक मोठे ‘द बीच हॉटेल” होते. ते आगीत नष्ट झाल्या नंतर सन 1898 मध्ये गल्वेस्टोंचे नागरिक असणाऱ्या नेत्यांनी गल्वेझ हॉटेल चालू करण्याची योजना केली होती. सन 1900 मध्ये या बिचवर मोठे वादळ झाले. या विनाशकारी वादळात अंदाजित 6000 गल्वेस्टोन बेटावरील रहिवाशी मृत झाले. तसेच बहुतेक इमारती जमीनदोस्त झाल्या. पर्यटकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी ज्या योजना तयार केल्या त्यात या हॉटेल गल्वेझचा समावेश होता. हॉटेल गल्वेझच्या पुन्नर्रंजिवनासाठी सेंट लुईस, मीसौरीचे मौरण, रशेल आणि क्रोवेन यांनी एक विशिष्ट पद्दत अवलंबून तसेच स्पॅनिश पद्दतीचा उपयोग करून एक डिझाईन तयार केले होते. जून 1911 मध्ये एक कोटी डालर खर्च करून हॉटेल गल्वेझ चालू केले.[२] दि. 3-10-1940 रोजी दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान विलियम लेविस मुडी ज्युनिअर यांनी हॉटेल गल्वेझ ताब्यात घेतले होते. तेव्हा हॉटेल गल्वेझ अमेरिकेच्या सय्युक्त राष्ट्र तटरक्षक दलाने दोन वर्षे ताब्यात ठेवले होते त्यामुळे पर्यटकांना तेथील जागा भाड्याने देण्यात येत न्हवत्या.

द्वितीय महायुद्धांनंतर हॉटेल गल्वेझ स्थानिक राज्य संस्थेस आर्थिक व्यवहारांत हातभार लाऊन मदत करू लागले. खासकरून सन 1940 व 1950च्या दशकात या हॉटेल गल्वेझ मध्ये बेकायदेशीर जुगार (ग्यांबलिंग) जुगार मोठ्या प्रमाणात प्रशिद्ध होता. सन 1950 मध्ये जुगार जेव्हा बंद केला तेव्हा स्थानिक लोक उदास झाले आणि हॉटेल गल्वेझ अडचणीत आले. [३]

सन 1965 मध्ये पुन्हा हॉटेल गल्वेझचे नूतनीकरण झाले. सन 1971 मध्ये हॉटेल गल्वेझ हार्वे ओ मक्कार्थेय आणि डॉक्टर लियॉन ब्रोम्बेर्ग यांनी ताब्यात घेतले होते. डेंटोण कुली यांनी सन 1978 मध्ये हॉटेल गल्वेझ खरेदी केले आणि सन 1979 मध्ये त्याचे नूतनीकरणाचे काम चालू केले होते. हॉटेल गल्वेझ सन 1989 मध्ये भव्य असे स्वतंत्र मताधिकार असणारे हॉटेल झाले होते. हॉटेल गल्वेझ त्यानंतर सन 1995 मध्ये गल्वेस्टोन देशी आणि रियल इस्टेट विकासक जॉर्ज पी मिशेल यांनी खरेदी केले होते. सन 1996 मधील कायदेशी संमझोत्यानुसार मिशेल जॉर्ज पी यांना हॉटेल गल्वेझचा मालमत्ता हक्क प्राप्त झाला. त्यानुसार मंगेमेंट ने हॉटेल विंडहम आणि रिसॉर्टचे रूपांतर हॉटेल गल्वेझ या नावात केलेले होते.

सेवा / सुविधा [४] संपादन

  1. हॉटेल गल्वेझ मध्ये 226 खोल्या आणि सूट आहेत.
  2. गल्वेस्टोनची ओळख "प्लेग्राऊंड ऑफ साऊथ वेस्ट" (दक्षिण पच्छिमेचे क्रीडा केंद्र ) अशीही होती. विशेषतः धनिक लोक, व्यवसाईक, सिलेब्रिटिज, साठी हे आदर्श होते.
  3. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रंकलीन दी रूसवेल्ट, द्वीघ्ट दी ऐसेन्होवर, ल्यंदोन बी जोन्सोन, येथे थांबलेले आहेत.
  4. जनरल डग्लस, मॅक आर्थर, जिम्मी स्टिवर्टं, फ्रँक सिनात्रा,हॉवर्ड हुजस यांच्यातिल जुनीयर आणि सीनियर साठी 6व्या व 7व्या मजल्यावरील सुट्स राखीव असत.

संकट संपादन

सन 2008 मध्ये वादळ झाल्याने हॉटेल गल्वेझचा छत, विटा, तुटून खराब झाल्या होत्या. हेल्थ क्लब, व्यापारी कार्यालय लांड्रि, ब्युटी पार्लर यांच्या खाली खूप पाणी भरले होते.[५]

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ "हॉटेल गल्वेझ आणि स्पा, व्य्न्धाम ग्रांड हॉटेल, ऐतिहासिक हॉटेल्स अमेरिका सदस्य" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "राष्ट्रीय नोंद माहिती प्रणाली" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2010-12-04. 2015-04-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ ""हॉटेल गल्वेझ" टेक्सास ऐतिहासिक साइट ऍटलस" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "हॉटेल गल्वेझ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ ""हॉटेल गल्वेझ चक्रीवादळा नंतर उघडले" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)