हैदर कुर्रतुल ऐन
हैदर, कुर्रतुल ऐन : (२० जानेवारी १९२७–२१ ऑगस्ट २००७). एक श्रेष्ठ भारतीय उर्दू लेखिका आणि ज्ञानपीठ पुरस्काराच्या मानकरी. ‘ऐनी आपा’ या नावानेही त्यांना संबोधले जात होते. त्यांचाजन्म अलीगढ (उत्तर प्रदेश) येथे वाङ्मयीन पार्श्वभूमी असलेल्या एका सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडीलस ज्जा द हैदर हे उर्दू साहित्यातील प्रसिद्ध कथाकार होते, तर आई नझर सज्जाद हैदर या नामवंत लेखिका होत्या. कुर्रतुल ऐन यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अलीगढ मध्ये झाले. पुढे त्यांनी लखनौ विद्यापीठातून इंग्रजी साहित्यांत एम्.ए. ही पदवी मिळवली (१९४७). १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत पाकिस्तानात स्थलांतर केले.
हैदर कुर्रतुल ऐन | |
---|---|
जन्म नाव | हैदर, कुर्रतुल ऐन |
टोपणनाव | ऐनी आपा |
जन्म |
२० जानेवारी १९२७ अलीगढ (उत्तर प्रदेश) |
मृत्यू | २१ ऑगस्ट २००७ |
शिक्षण | लखनौ विद्यापीठातून इंग्रजी साहित्यांत एम्.ए. |
भाषा | उर्दू |
साहित्य प्रकार | उर्दू लेखिका |