ह्युलेट-पॅकार्ड

(हेव्लेट-पॅकार्ड या पानावरून पुनर्निर्देशित)

ह्युलेट-पॅकार्ड कंपनी (किंवा एच.पी.) ही एक संगणक व संगणकाशी निगडित इतर वस्तू उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी आहे. सध्या डेस्कटॉप व लॅपटॉपचे उत्पादन व विक्रीमध्ये एच.पी.चा जगात पहिला क्रमांक आहे. एच.पी. मुख्यालय कॅलिफोर्निया राज्यातील सिलिकॉन व्हॅलीमधील पालो आल्टो ह्या शहरात आहे. बिल ह्युलेटडेव्हिड पॅकार्ड ह्या दोघांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर पालो आल्टोतील एका गॅरेजमध्ये ५३८ डॉलर्स एवढ्या भांडवलावर एच.पी.ची १९३९ साली स्थापना केली.

ह्युलेट-पॅकार्ड कंपनी
Hewlett-Packard Company
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र संगणक उत्पादक
स्थापना १९३९
पालो आल्टो, कॅलिफोर्निया
संस्थापक बिल ह्युलेट व डेव्हिड पॅकार्ड
मुख्यालय पालो आल्टो, कॅलिफोर्निया, Flag of the United States अमेरिका
महसूली उत्पन्न ११८.३६ अब्ज डॉलर्स
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
१०.४७३ अब्ज डॉलर्स
कर्मचारी ३,२५,०००
संकेतस्थळ ह्युलेट-पॅकार्ड.कॉम