हेगर्सटाउन (मेरीलँड)
(हेगर्सटाउन, मेरिलॅंड या पानावरून पुनर्निर्देशित)
हेगर्सटाउन अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील शहर आहे. वॉशिंग्टन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ३९,६६२ होती तर हेगर्सटाउन-मार्टिन्सबर्ग महानगराची लोकसंख्या २,६९,१४० होती.
इंटरस्टेट ७० आणि इंटरस्टेट ८१चा तिठा हेगर्सटाउनच्या हद्दीत आहे. सीएसएक्स, नॉरफोक सदर्न आणि विंचेस्टर अँड वेस्टर्न या रेल्वेकंपन्यांचे लोहमार्ग हेगर्सटाउनमधून जातात. येथील प्रादेशिक विमानतळावरून पिट्सबर्ग आणि बाल्टिमोर येथे तसेच ओरलँडो आणि सेंट पीटर्सबर्ग येथे मोसमी विमानसेवा उपलब्ध आहे.