हिरोजी नारायण तोडणकर
हिरोजी नारायण तोडणकर (७ डिसेंबर, १९१८:आचरेपिरावाडी, मालवण तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा - ??) हे एक स्वातंत्र्यसैनिक आहेत. १९३० सालच्या मिठाच्या सत्यायग्रहात त्यांचा सहभाग होता. प्रभात फेऱ्या काढून जनता उठावात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
तोडणकर १९३८मध्ये शिक्षक झाले आणि पुढे शिक्षण निरीक्षक. नोकरीत असतानाही ते १४ शाळांचे व्यवस्थापन करीत होते. कणकवलीजवळ्च्या श्रावण (गाव) येथील शाळेच्या सुरुवातीच्या बांधकामासाठी त्यांनी आर्थिक साहाय्य केले.
इ.स. १९६०पासून हिरोजी तोडणकरांनी मैला गोळा करण्याच्या जुन्या पद्धतीचे निर्मूलन करण्याचे काम हाती घेतले. राज्यभर फिरून त्यांनी २५ वर्षांत २ लाख संडास उभारले.
सन्मान
संपादन- पुण्यातील शारदा ज्ञानपीठम्कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून सत्कार (६-९-२०१६)