हिमांशु कुलकर्णी हे एक मराठी गझलकार आहेत. ते बडोद्याच्या महाराजा सयाजी विद्यापीठातून बी.टेक.चे सुवर्णपदक प्राप्त पदवीधर असून अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथून त्यांनी एम.बी.ए.ची पदवी प्राप्त केली आहे. प्रारंभी सोलापूर येथील लक्ष्मी विष्णू मिल्समध्ये जनरल मॅनेजरची नोकरी करून पुढे पुण्यात कल्याणी ब्रेक्स येथे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणूनही त्यांनी काम केले. अनेक वर्षे काव्यरचना करीत आहेत.

काव्यसंग्रह

संपादन
  • क़तरा क़तरा गम (उर्दू)
  • कविता उद्ध्वस्त रात्रींच्या
  • पणती जपून ठेवा
  • बाभुळवन
  • मी-माझी सावली
  • शहर-एक कबर
  • ह्या पाणपोयीवर मिळते फक्त तहान

ध्वनिफिती

संपादन
  • चाहूल चांदण्यांची (केवळ गझलांचा अल्बम-संगीतकार अशोक पत्की; गायक पूजा गायतोंडे आणि दत्तप्रसाद रानडे)
  • व्यथा चंदेरी (संगीतकार गिरीश जोशी)
  • क्षितिज (संगीतकार रवी दाते)