हिट विकेट
हिट विकेट ही क्रिकेटच्या खेळातील फलंदाज बाद होण्याची पद्धत आहे. खेळ सुरू असताना (चेंडू 'जिवंत' असताना) जर फलंदाजाने किंवा फलंदाजाने घातलेल्या कपडे, उपकरणे, बॅटने त्रिफळ्याला धक्का लागून त्यावरील बेल्स खाली पडल्या तर फलंदाज बाद होतो. याचे श्रेय गोलंदाजाला मिळते.
हा नियम फक्त स्ट्रायकरलाच लागू आहे. नॉन-स्ट्रायकरचा धक्का गोलंदाजाच्या बाजूच्या त्रिफळ्याला लागला तर तो चेंडू मृत (डेड बॉल) घोषित केला जातो. तसेच धाव काढताना हा नियम लागू नाही.