हिंदू धर्मामध्ये अनेक संप्रदाय/पंथ आणि उपसंप्रदाय आहेत. या संप्रदायामध्ये विविध हिंदू देवी देवता केंद्रस्थानी असतात. विष्णू केंद्रस्थानी असणारा वैष्णव संप्रदाय आणि शिव केंद्रस्थानी असणारा शैव संप्रदाय, हे दोन हिंदू धर्मातील मुख्य संप्रदाय मानले जातात.

वैष्णव संप्रदाय

संपादन

विष्णूला परमेश्‍वर मानून त्याची उपासना करणाऱ्या  पंथाला किंवा संप्रदायाला 'वैष्णव संप्रदाय' असे म्हणतात. हा संप्रदाय व्यापक अर्थाने भागवत धर्म' या नावाने ओळखला जातो. वेदवाड्मयात विष्णूला 'त्रित्रिक्रम' (तीन पावलांमध्ये  विश्‍व व्यापून टाकणारा अर्थात वामनावतार) म्हटले गेले. त्यानंतरच्या काळात विष्णू हा यज्ञरूप आणि सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आहे, अशी श्रद्धा निर्माण झोली. ऐतरेय ब्राह्मण ग्रंथात या श्रद्धेचे मूळ आहे. विष्णूने वेळोवेळी दहा अवतार घेऊन पृथ्वीवर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत आपली बिधायक भूमिका निभावली, असा लोकविश्‍वास आहे.

दक्षिण भारतातील आळवार भक्‍त

संपादन

तमीळ भाषिक वैष्णव संतकवींच्या परंपरेला आळवार असे म्हणतात. आळवार म्हणजे ईश्वराच्या प्रेमसागरात बुडून गेलेला भक्‍त होय. हे आळवार इ.स. ५०० ते ८०० या काळात होऊन गेले. दक्षिण भारतातील वैष्णव सांप्रदायिक बारा आळववारांना आचार्यांपेक्षा अधिक मान देतात. बाराआळवारांनी रचलेली सुमारे चार हजार पद्ये दिव्य प्रबंधम्‌' (अरूळिच्वॅयल) यां नावाने नाथमुनींनी नवव्या शतकात संकलित केली. आजही दक्षिण भारतातील वैष्णव मंदिरांमध्ये त्यांचे गायन केले जाते. हा ग्रंथ वैष्णव सांप्रदायिक वेदाइतका पवित्र मानतात.

महाराष्ट्रातील वैष्णव संप्रदाय

संपादन

भागवत धर्म किंवा वैष्णव संप्रदायान्तर्गत ज्यांचा समावेश होतो असे काही उपासना पंथ महाराष्ट्रात निर्माण झाले. त्यामध्ये

(१) वारकरी, (२) महानुभाव, (३) समर्थ हे प्रमुख आहेत.

वारकरी संप्रदायाने उपास्य दैवत मानलेला विठ्ठल हा कृष्णस्वरूप आहे. महानुभाव पंथात कृष्णोपासना केली जाते. विष्णूचा अवतार असलेल्या रामाची उपासना समर्थ संप्रदायात केंद्रस्थानी मानली जाते. या तीन उपासना पंथांनी महाराष्ट्राच्या प्रादेशिक सीमा कमी अधिक प्रमाणात ओलांडल्या.

शैव संप्रदाय

संपादन

“शिवा”ला परमेश्‍वर मानून त्याची उपासना करणाऱ्या पंथ किंवा संप्रदायाला 'शैव संप्रदाय' असे म्हणतात. शिवा हा संपूर्ण भारतात सर्व जाती-जमातींकडून पूजला जाणारा “महादेव' आहे. शैव संप्रदायांतर्गत पाशुपत पंथ, अघोरी पंथ, कापालिक पंथ, नाथ संप्रदाय, काश्मिरी शैव, नयन्मार शैव, वीरशैव (किंवा लिंगायत) या उपपंथांनी भारतभर शिवसंप्रदायाचा प्रसार केला.

महानुभाव संप्रदाय

संपादन

महाराष्ट्रात उगम पावून मध्य भारत, पंजाब, काबूल कंदाहारापर्यंत प्रसार पाबलेला 'महानुभाव संप्रदाय' हा एक महत्त्वाचा संप्रदाय आहे. त्याचा प्रारंभ श्री चक्रधरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात केला. हा संप्रदाय प्रारंभी 'महात्मा पंथ' 'परमार्ग', 'भटमार्ग' या नावाने ओळखला जात असे. या संप्रदायाला पंजाबात 'जय कृष्णी पंथ' तर गुजरातेत 'अच्युत पंथ' असे म्हणतात. या संप्रदायात कृष्णोपासना आणि दत्तोपासना केली जाते. गीता आणि भागवत हे ग्रंथ प्रमाणग्रंथ आहेत. हा द्वैतवादी संप्रदाय असून संन्यास मार्गावर अधिक भर देणारा आहे.

वारकरी संप्रदाय

संपादन

भारतीय जनजीवनात परंपरा ही एक अत्यंत महत्त्वाची शक्ती आहे. ती जुन्या आचार विचारांना नव्या स्वरूपात साकार करते. महाराष्ट्रात उगम पाबलेला “वारकरी संप्रदाय' हे याचे उत्तम उदाहरण आहे. वेद कालातील विष्णू देवतेचे पुढे भजनपूजन पुराणकाळात टिकून राहिले. पुढे गुप्त काळात त्यातून भागवत धर्म' अस्तित्वात आला. गुप्त काळात वैष्णव संप्रदायाची मुहूर्तमढ झाली. यादवकाळात परंपराप्राप्त भागवत धर्म आणि वैष्णव संप्रदायाचे महाराष्ट्रात 'वारकरी संप्रदाया'त रूपांतर झाले. त्याच्या प्रभावाची परंपरा अबाधित राहून तो आजही टिकून आहे.

पंढरपूर येथील विठ्ठलाची उपासना करणाऱ्या संप्रदायाला “वारकरी संप्रदाय' असे म्हटले जाते. आषाढी, कार्तिकी, माघी किंवा चैत्र शुद्ध एकादशीला, गळ्यात तुळशीमाला घालून नियमाने पंढरपूरला जाणाऱ्याला "वारकरी" असे म्हणतात. हा संप्रदाय 'बैष्णव धर्म', 'वैष्णव संप्रदाय', “भागवत धर्म', भागवत संप्रदाय', 'माळकरी पंथ' अशा विविध नावांनी ओळखला जातो.भक्त पुंडलिकापासून हा संप्रदाय सुरू झाला. त्याचा कालखंड अद्यापही एकमताने निश्‍चित झाला नसला तरी तो ज्ञानेश्‍वरांआधी किमान ५० वर्षे होऊन गेला असे मानले जाते.

संदर्भ

संपादन