हा खेळ सावल्यांचा हा १९७६ मधील मराठी भाषेतील चित्रपट आहे. याचे निर्माते व्ही. रविंद्र आहेत. तर या चित्रपटात काशिनाथ घाणेकर, आशा काळे, अशोक कुमार आणि राजा गोसावी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हा खेळ सावल्यांचा
दिग्दर्शन वसंत जोगळेकर
निर्मिती सुमती गुप्ते
कथा सुमती गुप्ते
पटकथा मधुसूदन कालेलकर
प्रमुख कलाकार काशिनाथ घाणेकर, आशा काळे, अशोक कुमार आणि राजा गोसावी
संवाद मधुसूदन कालेलकर
संगीत हृदयनाथ मंगेशकर
पार्श्वगायन आशा भोसले, हेमंत कुमार, महेंद्र कुमार, महेंद्रकपूर, अनुराधा पौडवाल
भाषा मराठी
प्रदर्शित १९७६

कलाकार

संपादन

अशोक कुमार, आशा काळे, चंद्रकांत खोत, जयराम कुलकर्णी, डॉ. काशिनाथ घाणेकर, देवेन वर्मा, धुमाळ, मधू आपटे, मधू जोगळेकर, मूकूंद गोसावी, राजा गोसावी, लालन सारंग, विजया वर्मा, शीला वालावलकर, श्रीकांत मोघे, संगीता घोले, संजीवनी बिडकर, सुमति गुप्ते

पार्श्वगायक

संपादन

आशा भोसले, हेमंत कुमार, महेंद्र कुमार, महेंद्रकपूर, अनुराधा पौडवाल

  1. आला आला वारा संगे पावसाच्या धारा,
  2. काजळ रातीनं ओढून नेला,
  3. गोमू संगतीन माझ्या तू येशील कां,
  4. रात्रीस खेळे चाले हा गूढ चांदण्याचा

कथानक

संपादन

अभिनेत्री भूताच्या भीतीने वेडी होते. तिचा भावी पती डॉक्टर असल्याने तो तिच्यावर उपचार सुरू करतो. ती तात्पुरती बरी होते पण तिचे वेडेपण परत येतं. भावी पती अपयश मानून परत जायची तयारी करतो. त्याच रात्री भूत त्या वेडीला गळफास घ्यायचा ईशारा करतो. तिचा भावी पाती येऊन तिला वाचवतो आणि भूताचा पर्दा फाश करतो.