हार्टफर्ड (कनेटिकट)
अमेरिका देशातील कनेटिकट राज्याची राजधानी
(हार्टफर्ड, कनेक्टिकट या पानावरून पुनर्निर्देशित)
हार्टफर्ड ही अमेरिका देशातील कनेटिकट राज्याची राजधानी व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर अमेरिकेच्या न्यू इंग्लंड प्रदेशात कनेटिकटच्या मध्य भागात कनेटिकट नदीच्या किनाऱ्यावर वसले असून येथील लोकसंख्या १.४४ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १२ लाख इतकी आहे.
हार्टफर्ड Hartford |
|
अमेरिकामधील शहर | |
कनेटिकट नदी किनाऱ्यावरील हार्टफर्ड |
|
गुणक: 41°45′45.85″N 72°40′27.43″W / 41.7627361°N 72.6742861°W |
|
देश | अमेरिका |
राज्य | कनेटिकट |
स्थापना वर्ष | इ.स. १६३७ |
क्षेत्रफळ | ४६.५ चौ. किमी (१८.० चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५९ फूट (१८ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | १,४४,७७५ |
- घनता | १,१६९.८ /चौ. किमी (३,०३० /चौ. मैल) |
- महानगर | १२,१२,३८१ |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० |
www.hartford.gov |
हार्टफर्ड हे अमेरिकेमधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. येथील वस्तीची पहिली नोंद इ.स. १६२३ची आहे. या शहराचे मूळ नाव सौकियॉग (Saukiog) असे होते. अमेरिकन यादवी युद्धानंतर अनेक दशके हार्टफर्ड हे अमेरिकेमधील सर्वात श्रीमंत शहर होते. आजही दरडोई उत्पन्नामध्ये हार्टफर्डचा अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को खालोखाल दुसरा क्रमांक लागतो.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |