हाजमोळा चहा भारताच्या वाराणसी शहरात मिळणारा चहाचा प्रकार आहे.

वाराणसी मध्ये चहा अड्ड्यावर हाजमोळा चहा आपल्या विशिष्ट स्वादासाठी फारच ओळखला जातो. हाजमोळा आणि जिरेपूड मुळे ह्याला एक सुंदर सुगंध येत असतो. अस्सीघाटावर हा मनोज सिंहच्या चहाटपरीवर मिळतो. त्यामध्ये नाणा आणि आले घातल्याने तो फारच रुचकर लागतो. वाराणसी मध्ये पूर्वी बंगाली लोकांच्या घरातच हा चहा मिळत असे.परदेशी पर्यटकांना हा चहा फार आवडतो.दश अश्वमेध घाटावर असलेल्या ७२ वर्षे पूर्ण झालेल्या दुकानाचे गोपाळ साहानी त्या चहाची लज्जत वाढविण्यासाठी दालचिनी, लवंग आणि वेलची पूड सुद्धा टाकतात. हाजमोळा चहा त्याची तिखटगोड चव आणि शरीराला होणाऱ्या फायद्यासाठी आवडीने पिला जातो.हा पचनासाठी फारच उपयुक्त असतो. भरपूर जेवण झाल्यानंतर हा नक्कीच पिण्यात येतो.

साहित्य १/२ कप चहा आणि पाणी २ नाणा पाने १/२ चमचा ओवा १ हाजमोळा २ चमचे साखर १/२ चमचा लिंबू रस १/२ चमचा काळीमिरी १/२ चमचा जिरे १/२ चमचा खडे मीठ.

कृती १.चहा पाने कडक रंग येईपर्यंत भिजत ठेवतात. २.ओवा, काळीमिरी, जिरेपूड आणि खडेमीठ त्यामध्ये टाकतात. ३.लिंबूरस पिळतात. ४.साखर आणि हाजमोळा पावडर टाकतात. ५.चहा गाळतात आणि गरमागरम प्यायला देतात.


संदर्भ

संपादन

मुंबई टाईम्स ०९/०९/२०१९.