हवामानाचा अंदाज म्हणजे एखाद्या स्थानासाठी आणि वेळेसाठी वातावरणाची परिस्थिती सांगण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करणे. लोकांनी हजारो वर्षांपासून अनौपचारिकरित्या हवामानाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला आहे . परंतु १९ व्या शतकापासून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून औपचारिकरित्या हवामानाचा अंदाज लोक लावायला लागले. हवामानाचा अंदाज एखाद्या निश्चित ठिकाणी असलेल्या वातावरणाच्या सद्यस्थितीबद्दल परिमाणात्मक डेटा गोळा करून आणि वातावरण कसे बदलेल हे प्रोजेक्ट करण्यासाठी हवामानशास्त्र वापरून केले जाते. पूर्वी प्रामुख्याने बॅरोमेट्रिक प्रेशर, सध्याचे हवामान आणि आकाशातील स्थिती किंवा ढगांतील बदल यावर आधारित समीकरण सोडवून हवामानाचा अंदाज लावला जायचा. आता हेच काम संगणकामुळे अधिक सोपे झाले आहे. तसेच संगणक अनेक वातावरणीय घटकांचा प्रभाव लक्षात घेऊन अधिक चांगला अंदाज लावतात. [१]

उत्तर प्रशांत महासागर, उत्तर अमेरिका आणि उत्तर अटलांटिक महासागरासाठी पृष्ठभागाच्या दबावाचा पाच दिवसांचा अंदाज

हवामानाचा अंदाज निश्चित करण्यासाठी मानवी हस्तक्षेपाची गरज लागते. सर्वोत्तम संभाव्य मॉडेल निवडणे आवश्यक असते, ज्यात नमुना ओळखण्याची कौशल्ये, दूरसंचार, मॉडेलच्या कामगिरीचे ज्ञान आणि मॉडेल बायपासचे ज्ञान असणे आवश्यक असते. हवामानाचे अव्यवस्थित स्वरूप, वातावरणाचे वर्णन करणारे समीकरण सोडविण्यासाठी आवश्यक असलेली प्रचंड संगणकीय शक्ती, प्रारंभीची परिस्थिती मोजण्यात केलेली त्रुटी आणि वातावरणीय प्रक्रियेची अपूर्ण समज यामुळे पूर्वानुमान आजही शंभर टक्के खरे नसते. म्हणूनच, वर्तमान वेळ आणि ज्या वेळेसाठी अंदाज केला जात आहे त्या दरम्यानचा फरक (अंदाजाची श्रेणी) वाढत असल्याने अंदाज चूकण्याचे संभाव्यता वाढते. एन्सेम्बल्स आणि मॉडेल एकमतचा वापर त्रुटी कमी करण्यात आणि बहुधा संभाव्य निकाल घेण्यास मदत करतो.

हवामानाच्या अंदाजाचे वापर करण्याचे विविध उपयोग आहेत. हवामानातील बदलाची चेतावणी देणे हे महत्त्वाचे अंदाज आहेत, कारण ते जीव आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी वापरले जातात. तापमान आणि पावसाचा अंदाज शेतीसाठी महत्त्वाचे असतात आणि त्यामुळे कमोडिटी मार्केटमधील व्यापाऱ्यांसाठीही महत्त्वाचे ठरतात. येत्या काही दिवसांत मागणीचा अंदाज लावण्यासाठी युटिलिटी कंपन्यांद्वारे तापमान वाढीचा अंदाज वापरला जातो. हवामानचा अंदाज घेऊन सर्वसामान्य लोक त्या दिवशी काय कपडे घालायचे हे ठरवतात. मुसळधार पाऊस, बर्फ आणि थंड वारा यामुळे घराबाहेर काम करणे कठीण होत असल्याने, या घटनांच्या सभोवतालच्या क्रियाकलापांचे नियोजन करण्यासाठी आणि त्यापूर्वीचे नियोजन करण्यासाठी आणि त्यापासून बचाव करण्यासाठी हवामानाचा अंदाज वापरला जाऊ शकतो. इ.स. २००१ मध्ये अमेरिकेने हवामानाच्या अंदाजावर तब्बल ५.१ अब्ज डॉलर्स खर्च केले. [२]

आपल्याला दैनंदिन जीवनाचे व्यवस्थापनामध्ये, शेतीच्या व्यवस्थापनामध्ये किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक, सामाजिक व्यवस्थापनामध्ये होत असतो त्यासाठी हा लेख अवश्य वाचा.

भारत देशाचे हवामान, हवा म्हणजे काय? आणि हवामान (weather) म्हणजे काय? हवेची स्थिती. हवेची स्थिती. द्वीपकल्प, हवामानाचा अंदाज, आजचे हवामान कालचे हवामान किंवा आठवड्याभरात हवामान

हवा आणि हवामान

भारताचे क्षेत्रफळ हे ३२,८७,२६३ चौरस किलोमीटर आहे. भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या २. ४२ टक्के क्षेत्र

भारताने व्यापली आहे. भारताची दक्षिण उत्तर लांबी ३२१४ किलोमीटर आणि पूर्व-पश्चिम विस्तार हा २९३३

किलोमीटर आहे. भारताच्या मुख्य भूमीचा लाभलेला समुद्रकिनारा हा ६१०० किलोमीटर आहे. भारत हा उत्तर पूर्व

गोलार्धात आहे आणि भारताच्या वायव्य दिशेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे राष्ट्र आहेत, तर भारताच्या

उत्तरेस चीन नेपाळ भूतान तिबेट हे राष्ट्र आहे. भारतामध्ये आपण जर या रचनेचा विचार केला तर भारतात

द्वीपकल्पात मोडतो. द्वीपकल्प म्हणजे तीन बाजूने समुद्र आणि एका बाजूने जमीन असलेला भूभाग.


जर आपण भारताचा नकाशा बघितला तर भारताच्या उत्तरेस देश आहेत आणि बाकी तिन्ही बाजूने पाणी आहेत त्याला द्वीपकल्प

असे म्हणतात.

भारत देशाचे हवामान हे मान्सून या प्रकारात मोडते. कारण भारताच्या मध्यातून गेलेला कर्कवृत्तच्या जवळ सूर्य

किरणे ही लंबरूप पडत असतात आणि त्यामुळे येथे तापमान जे आहे ते अधिक अधिक होत जाते. भारतामध्ये सरासरी

वार्षिक तापमान कक्षा दक्षिणेकडे वाढत जाते.


उन्हाळ्यात राजस्थान मध्ये तापमान हे सगळ्यात अधिक असते.भारतामध्ये उन्हाळा मार्च ते मेपर्यंत, पावसाळा जून ते सप्टेंबर, आणि परतीचा मान्सून ऑक्टोबर ते नोव्हेंबर, आणि

हिवाळा डिसेंबर ते फेब्रुवारी असा भारतामध्ये जवळजवळ मुख्य तीन ऋतू आहेत, उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा.

जगामध्ये फक्त दोनच ऋतू असतात उन्हाळा आणि हिवाळा.भारत हा एकमेव असा देश आहे की जेथे आपण तीन ऋतू

वेगवेगळे अनुभवत असतो उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा. हे भारताचे वैशिष्ट्य आहे.


हवा म्हणजे काय? आणि हवामान (weather) म्हणजे काय? यातील मुख्य फरक आपल्याला जाणून घ्यायला हवा.

हवा (climate) म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती. एखाद्या

ठिकाणची हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान. हवा नेहेमी बदलत असते ते सहजपणे जाणवतात

आणि हवामान सर्वत्र सारखे नसते. हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात ते सहजपणे जाणवत नसतात.

उदाहरणार्थ मुंबईचे हवामान दमट आहे पश्चिम महाराष्ट्रातील हवामान कोरडे आहे. तर आज मुंबईत खूप उष्णता

जास्त आहे आद्रता मध्यम आहे हे झाले हवा पश्चिम महाराष्ट्रात आज तापमान जास्त आहे आद्रता कमी आहे ही झाली

तशी महाराष्ट्राची हवेची स्थिती.


हवेची मुख्य अंगे तपमान (temperature), वारे (air), आद्रता (humidity), वायुदाब (air pressure), वृष्टी

(precipitation in common rain). तपमान ही एक भौतिक परिमाण आहे. वातावरणातील स्थितीचे वर्णन

करण्यासाठी हे परिमाण वापरले जाते. बऱ्याच वेळा आपण बातम्यांमध्ये असे ऐकतो आजचे तापमान

दिवसभरातलेचे. वातावरणातील बदल जे आहेत ते तापमानामध्ये सांगितले जाते. तपमान हा थर्मामीटर या

साधनाने मोजला जातो. सेल्सियस किंवा डिग्री फॅरेनहाईट हे एकक परिमाण आहे. हवामानाचा अंदाजात

जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमान हे नोंदवलेले असते. त्यावरून हवामानाच्या स्थितीचा जो अंदाज आहे

तो आपल्या लक्षात येतो.


हवामानाचा अंदाज म्हणजे एखाद्या स्थानासाठी आणि वेळेसाठी वातावरणाची परिस्थिती

सांगण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेणे आणि त्यानुसार त्याठिकाणची आकाशाची स्थिती

सध्याचे हवामान ढगातील बदल यावर समीकरण मांडून हवामानाचा अंदाज लावला जातो. तसेच हे काम आता

संगणकाच्या साह्याने केले जाते. हवामानाचा अंदाज वापर करण्याचे विविध उपयोग आहेत त्याच्यामुळे आपल्याला

येणाऱ्या संकटाचे म्हणजे अतिवृष्टी तापमानीलं बदल, पूरजन्य स्थिती इत्यादीची कल्पना येते. यापासून आपला

बचाव होतो.

भारतीय वातावरण वैज्ञानिक खात्याचे (Indian Institute of Tropical Meteorology) IITM,

महासंचालक खात्याचे कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संस्था आय टी एम इंडियन

इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुण्यामध्ये आहे. भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याचे महासंचालक खात्याचे

कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. Archived 2022-02-26 at the Wayback Machine.


हवा आणि हवामान या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत हे तर आपण स्पष्ट केलेलेच आहेत. हवेशिवाय आपले जीवन

हे शक्यच नाही. पंचमहाभूतांनी बनलेल्या या आपल्या देहामध्ये जगण्यासाठी हवा आणि आजूबाजूचे वातावरण हे खूप

मदत करत असते. हवामानाचा अंदाज यामुळे आपण आपला बचाव योग्य पद्धतीने करू शकतो. निसर्ग आपल्याला

भरभरून देत असतो आणि त्याची आपण योग्य कशी काळजी घ्यायची याचा एक अंदाज हवा आणि हवामानाचा

अभ्यासावरून येत असतो.

हवामानाचा अंदाज वरून आपल्याला आजचे हवामान कालचे हवामान किंवा

आठवड्याभरात हवामान याचा अंदाज योग्य पद्धतीने येतो, ज्याचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनाचे

व्यवस्थापनामध्ये, शेतीच्या व्यवस्थापनामध्ये किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक, सामाजिक

व्यवस्थापनामध्ये होत असतो त्यासाठी हा लेख अवश्य वाचा.


प्रश्न १. भारताचे क्षेत्रफळ हे किती चौरस किलोमीटर आहे?

उतर : भारताचे क्षेत्रफळ हे ३२,८७,२६३ चौरस किलोमीटर आहे.

प्रश्न २. भारत देशाचे हवामान हे कोणत्या या प्रकारात मोडते?

उतर : भारत देशाचे हवामान हे मान्सून या प्रकारात मोडते.

प्रश्न ३.द्वीपकल्प म्हणजे काय ?

उतर : द्वीपकल्प म्हणजे तीन बाजूने समुद्र आणि एका बाजूने जमीन असलेला भूभाग.

प्रश्न ४.हवेची मुख्य अंगे कोणती ?

उतर : हवेची मुख्य अंगे तपमान ( tempture ), वारे (air), आद्रता (humidity), वायुदाब (air pressure), वृष्टी (precipitation in common rain).

प्रश्न ५ .भारतीय वातावरण वैज्ञानिक खात्याचे (Indian Institute of Tropical Meteorology) IITM, महासंचालक खात्याचे कार्यालय कोठे आहे ?

उतर : भारतीय वातावरण वैज्ञानिक खात्याचे (Indian Institute of Tropical Meteorology) IITM, महासंचालक खात्याचे कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. हवामान अंदाज महाराष्ट्र

संदर्भ संपादन

  1. ^ Dirmeyer, Paul A.; Schlosser, C. Adam; Brubaker, Kaye L. (February 1, 2009). "Precipitation, Recycling, and Land Memory: An Integrated Analysis" (PDF). Journal of Hydrometeorology. 10 (1): 278–288. Bibcode:2009JHyMe..10..278D. doi:10.1175/2008JHM1016.1. hdl:1721.1/52326.
  2. ^ Fostering Innovation, Creating Jobs, Driving Better Decisions: The Value of Government Data. Economics and Statistics Administration Office of the Chief Economist. July 2014. p. 15. Archived from the original on August 29, 2018. December 30, 2018 रोजी पाहिले.