हर्मन हॉलेरिथ (२९ फेब्रुवारी, १८६० - १७ नोव्हेंबर, १९२९) हा अमेरिकन शोधक होता. याने माहितीचे संकलन करण्यासाठीचे सर्वप्रथम विद्युतयांत्रिकी यंत्र तयार केले होते. या यंत्रात सुधारणा करून नंतर ते गणितातील प्रश्न सोडविण्यासाठी वापरले.

हर्मन हॉलेरिथ

त्याने टॅब्युलेटिंग मशीन कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे इतर तीन कंपन्यांशी एकत्रीकरण झाल्यावर कम्प्युटिंग-टॅब्युलेटिंग-रेकॉर्डिंग कंपनीमध्ये रूपांतर झाले. या कंपनीने नंतर आयबीएम हे नाव धारण केले.