हरीश चंद्र

(हरीश-चंद्र (गणितज्ञ) या पानावरून पुनर्निर्देशित)

हरीश-चंद्र चंद्रकिशोर मेहरोत्रा (११ ऑक्टोबर, १९२३:कानपूर, उत्तर प्रदेश, भारत – १६ ऑक्टोबर, १९८३:प्रिन्सटन, न्यू जर्सी, अमेरिका) हे भारतीय गणितज्ञ होते. डॉ.हरिश्चंद्र (११ ऑक्टोबर, इ.स. १९२३ - इ.स. १९८३) हे भारतीय गणितज्ञ होते.

हरिश्चंद्रांचा जन्म ११ ऑक्टोबर, इ.स. १९२३ रोजी कानपूर येथे झाला. इ.स. १९४३ मध्ये अलाहाबाद विश्वविद्यालयातून एम.एस्‌सी. झाल्यानंतर त्यांनी इ.स. १९४७ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. ही पदवी मिळवली.

केंब्रिज येथे डॉ. हरिश्चंद्राना पॉल डिरॅक, वेइल आणि शेव्हले हे गणितज्ञ भेटले. त्यांच्याबरोबर त्याना गणितातल्या लाय ग्रुप्सवर संशोधन केले. इ.स. १९५० ते इ.स. १९६३ या काळात ते अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक होते. इ.स. १९५४ मधे त्यांना अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीचे कोल पारितोषिक मिळाले. इ.स. १९६२ मध्ये ते अमेरिकेतल्या न्यू जर्सी विद्यापीठात आमंत्रित प्राध्यापक होते. पुढे इ.स. १९६८ ते इ.स. १९८३ या काळात डॉ. हरिश्चंद्र यांची अमेरिकेतल्याच प्रिन्सटन विद्यापीठात न्यूमन प्रोफेसर या अध्यासनावर नेमणूक झाली. याच काळादरम्यान ते अमेरिकेच्या नॅशनल अ‍ॅकॅडमीचे आणि इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे सदस्य झाले.

डॉ.हरिश्चंद्रांना भौतिकशास्त्राची आवड होती. डॉ.डिरॅक यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ क्वांटम मेकॅनिक्स या पुस्तकावर भाळून त्यांनी भौतिकशास्त्राकडे जावे असे ठरवले होते. पण पुढे प्रत्यक्ष डॉ.डिरॅक भेटल्यावर त्यांच्या सूचनेनुसार ते गणिताकडे वळले.

पुरस्कार संपादन

भारतात आल्यावर इ.स. १९७४ मध्ये डॉ.हरिश्चंद्र यांचा इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमीने श्रीनिवास रामानुजम पुरस्कार देऊन गौरव केला.

डॉ. हरिश्चंद्रांचे इ.स. १९८३ मध्ये निधन झाले.

प्रकाशन संपादन

हरिश्चंद्र यांचे शोधनिबंध ट्रॅन्झॅक्शन्स ऑफ अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत. स्प्रिंगर व्हेरलॅग या गणिताची पुस्तके प्रसिद्ध करणाऱ्या प्रकाशन संस्थेने कलेक्टेड वर्क्स ऑफ डॉ.हरिश्चंद्र या नावाने त्यांचे सर्व शोधनिबंध, ४ भागांत छापले आहेत. फारच थोड्या भारतीयांना हा मान मिळाला आहे.

संशोधन संपादन

डॉ.हरिश्चंद्र यांचे संशोधन खालील विषयांत आहे.

  • संवादी विश्लेषण (इंग्लिश: Harmonic Analysis ;)
  • अर्धसुगम लाय संघ (इंग्रजी: Semisimple Lie Groups)
  • लाय संघांचे प्रतिरूपण (इंग्रजी: Representation of Lie Groups)
  • लाय संघांचे विघटन (इंग्रजी: Lie Groups Decompositions)
  • हरिश्चंद्र गट (इंग्रजी: Harish-Chandra Classes)
  • हरिश्चंद्र स्वयंरूपिता (इंग्रजी: Harish-Chandra Automorphism)
  • अनुज्ञेय प्रतिरूपणे ((इंग्रजी: Admissible Representations)
  • अतिलघु गटफले (इंग्रजी: Infinitesimal Characters)