हरिश्चंद्र मेहरा (नामभेद:हरीश चंद्र मेहरा) हे वयाच्या १४ व्या वर्षी भारताच्या राष्ट्रीय शौर्य पुरस्काराचे पहिले विजेते होते. हरिश्चंद्र यांचे शौर्य पाहून १९५७ पासून वीर बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.[]

वैयक्तिक आयुष्य

संपादन

हरीशचंद्र यांचा जन्म १९४४ साली झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी देवी आणि वडिलांचे नाव राजिंद्र नाथ मेहरा होते.[] आर्थिक अडचणींमुळे मेहरा यांना त्यांचा अभ्यास पूर्ण करता आला नाही. त्यामुळे त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धौलपूर हाऊस कार्यालयात 'कनिष्ठ विभागीय लिपिक' म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तीन वर्षानंतर त्यांची कोणत्याही पदोन्नतीशिवाय 'प्रकाशन नियंत्रक' पदावर बदली झाली. इ.स. २००४ मध्ये ते त्याच कार्यालयातून 'उच्च विभागीय लिपिक' म्हणून सेवानिवृत्त झाले.[]

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

संपादन

२ ऑक्टोबर १९५७ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, जगजीवन राम आणि विविध मान्यवर दिल्लीतील रामलीला मैदानावर रामलीला पाहत होते. १४ वर्षीय मेहरा प्रेक्षक मंडपात स्काउटच्या रूपात सर्वसामान्य लोकांत बसले होते.[] कार्यक्रमातील फटाक्यांच्या ठिणगीने मंडपाने अचानक पेट घेतला. पंतप्रधान नेहरू सहित अनेक मान्यवर या मंडपात अडकले होते. हरीश मेहरा यांनी तत्परतेने २० फूट उंचीच्या खांबावर चढून आपल्या स्काऊटच्या चाकूने जळत्या छताचे कापड कापून आग आटोक्यात आणली. हे काम करताना मेहरा यांचे दोन्ही हात चांगलेच भाजले होते.[] एका सामान्य मुलाच्या या धाडसाने जवाहरलाल नेहरू खूप प्रभावित झाले आणि त्यांनी अशा धाडसी मुलांचा अखिल भारतीय स्तरावर सन्मान करण्याचे ठरवले. त्यावेळेस हरीशचंद्र मेहरा यांना पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला.[]

इ.स. १९५७ मध्ये पुरस्काराची सुरुवात झाल्यापासून ते २०१४ पर्यंत भारतीय बाल कल्याण परिषदेने ८७१ धाडसी मुलांना हा पुरस्कार प्रदान केला आहे, ज्यात ६१८ मुले आणि २५३ मुली आहेत.[][][][]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c "Life beyond glory" [महिमा से परे जीवन] (इंग्रजी भाषेत). द ट्रिब्यून. २२ जानेवारी २०१२. १ मार्च २०१४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b c "बालवीर, जिन्हें भुला दिया गया". नवभारत टाईम्स. २६ जानेवारी २०१४. २ फेब्रुवारी २०१४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "25 बच्‍चे राष्‍ट्रीय बहादुरी पुरस्‍कार से सम्‍मानित". पत्र सूचना कार्यालय, भारत सरकार. १९ जानेवारी २०१४. १ फेब्रुवारी २०१४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ निमि कुरियन (३ मार्च २००१). "Ideas and thoughts" [मत और विचार] (इंग्रजी भाषेत). द हिन्दू. २६ जानेवारी २०१६ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "First brave child, braving the odds at 59..." [प्रथम बहादूर बच्चे ने अपनी बहादूरी के ५९ वर्ष के] (अंग्रेज़ी भाषेत). द हिन्दू. २३ जानेवारी २००३. ८ जुलै २००४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ रेणु सरण (२०१४). 51 Children Winners of National Bravery Award [राष्ट्रीय वीरता पुरस्कार विजेता ५१ बच्चे] (अंग्रेज़ी भाषेत). डायमंड पॉकेट बुक्स प्राइवेट लिमिटेड. p. १२-१३. ISBN 9789350836408. ४ मार्च २०१६ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

संपादन