हयात रिजन्सी (चेन्नई)

भारत देशाचे तामिळनाडूचे चेन्नई राजधानीचे शहरात तेयनांपेट येथील ३६५, अन्नासलाई येथे हे हयात रिजेन्सी चेन्नई पंचतारांकीत हॉटेल आहे. याचा आराखडा १९८६ मध्ये बनविला होता. सन १९९० मध्ये बांधकाम सुरू झाले. पण हे काम पूर्ण होण्यास २० वर्षाचा काळं लोटला होता. दि.१० ऑगस्ट २०११ रोजी हे हॉटेल सुरू झाले. त्याचा बांधकाम खर्च ५.५० बिल्लियन झाला होता. त्याचे जमीनीचे क्षेत्र ८३ आहे. हे दक्षिण भारतातील पहिले हयात हॉटेल आहे.[] याच्या ३२५ खोल्या आहेत. ही १८ माळ्याची इमारत आहे. यांची वेब साईट “chennai.regency.hyatt.com” आहे.

इतिहास

संपादन

सन १९४२ मध्ये या शहराचा नकाशा पाहिल्यानंतर या हॉटेलची मुळची जमीन सरकारची होती आणि ती तेयनांपेट विल्ला नावाने ओळखली जात होती की जी पी.एस. विश्वनाथन अय्यर, आई.सी.एस. यांना १९४० मध्ये दिलेली होती. हा सभाग्रंहाचा भाग पुन्हा अब्बोट्स्बुरी यांनी १९५० मध्ये ताब्यात घेतला होता. त्यानंतर लवकरच या मालमत्तेचे तारापोरे हे मालक झाले आणि त्यांनी ती पुट्टपार्थीचे साई बाबाना बक्षीस दिली. ही मालमत्ता त्यांनी नंतर बालाजी ग्रुप हॉटेलचे संस्थापक मगुंता सुब्बरमी रेड्डी यांना विकली. या वास्तूचे बांधकाम पाडले आणि त्यांनी हेलीपॅड सुविधेसह ३२० खोल्यांचे आरामदाईक हॉटेल बांधण्याची २५०००० स्क्वे.फ़ूट. व्यवसाय केंद्रासाठी जागा ठेवन्याचे नियोजन केले. बालाजी ग्रुप ऑफ हॉटेलने ओबेरॉय ग्रुप ऑफ हॉटेल्सशी एकत्रीकरण करून सन १९८९ मध्ये बांधकाम खर्च २.९० बिल्लियन अंदाज करून बांधकाम चालू केले. या ग्रुपणे मगुंता ओबेरॉय या नावाने या हॉटेलचे बांधकाम चालू केले होते पण मगुंता सुब्बरमी रेड्डी यांचा खून झाला व ओबेरीओ यांनीही त्याच वर्षी या प्रोजेक्ट मधून अंग काढून घेतले त्यामुळे हा ग्रुप आर्थिक अडचणीत आला आणि सन २००० मध्ये जवळ जवळ ७५% काम पूर्ण झालेले असताना बांधकाम थंडावले. हे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. या अर्धवट असणाऱ्या बांधकामाची मालमत्ता ललीत सूरी यांनी ३.९० बिल्लियन देऊन ताब्यात घेतली.[] ललीत सूरी यांचा मृत्यु झाल्यानंतर रोबूस्त हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडशी जवळीक असणारे सराफ ग्रुपने याची खरेदी केली आणि IFCI व TFCI यांचा विकासासाठी संगम करून आंतरराष्ट्रीय कन्सल्टन्सी फर्मकडे या प्रोजेक्टचे काम पूर्ण करण्याचे व्यवस्थापन सोपविले. त्यांनी त्याचा २००८ मध्ये आराखडा बदलला आणि फेब्रुवरी २०११ मध्ये काम पूर्ण केले. सराफ ग्रुप ऑफ हॉटेलने ८ ऑगस्ट २०११ मध्ये हयात रिजन्सी चेन्नई या नावाने हॉटेल सुरू केले.

हॉटेल

संपादन

या हॉटेलच्या ३२५ खोल्या आहेत. विविध कार्यक्रमासाठी ६००००० स्क्वे.फ़ूट.रिकामी जागा आहे. त्यातील २०००० स्क्वे.फ़ूट. पेक्षा जास्त जास्तं होईल इतकी जागा विविध कार्यक्रमासाठी आहे तेथून मुक्तपणे हिरवळिची आकर्षकता न्याहाळता येते. तेथे स्वास्थ्य केंद्र, चिक लॉबी लांज, बिस्कोट्टी, गौरमेट डेली, स्पाइस हाट, आणि २४ तास चालू असणारे २४० लोक बसू शकतील एवढे भव्य रेस्टारंट आहे. चायनाचे सिचुयन विभागातील चायनिजचे कुशन आहे. ९००० स्क्वे.फ़ूट. जागेवर स्पाइस हाटचे खाध्य पदार्थ मेनू आहेत. येथील पांच स्वयपांक घरांची भारतीय व इतर खाद्यपदार्थ विशेष पददतीने बनविण्याची खाशीयत आहे. हॉटेलचे मध्यभागी ओसरीवर निवांत पडून राहण्याची २४ तास व्यवस्था आहे व तेथून हॉटेल परीसराचा हिरवळीतील देखावा नगरेत सामाऊन मनाला सुखवतो आणि आनंद देतो. हॉटेलचे बाहेरील परिसरात देखील लहानसा पाण्याचा कुंड आहे तेथून तुम्ही शहरातील मनोरंजक देखावे, साचविलेल्या, सजविलेल्या,कलात्मकता, पाहू शकता. या सुविधेत भर म्हणजे रिजेन्सी क्लब, सिद्धस्पा, प्रीमियम सुट्स, वैशिष्ट्यपूर्ण रेस्तारंट्स, आणि बार ! येथे भारत देश आणि इतर ठिकानच्या ४० पेक्षा जास्त कलाकारांनी बनविलेल्या अनेक कलाकुसरीच्या वस्तु लोकांचे नजरेत भरतील अशा तऱ्हेने एका दालनात संग्रहीत केलेल्या आहेत.[]

या हॉटेलमध्ये रमणी हॉटेल्स लिमिटेड यांनी १.२० बिल्लियन खर्च करून रमी मॉल नावाने अर्धा तळमजला, पहिला व पूर्ण दूसरा मजला शॉपिंगसाठी विकशीत केलेला आहे. या मॉलचा आराखडा पी.जी.पत्की या वास्तुविशारदाणी तयार केलेला आहे. यात ही १५०००० स्क्वे.फ़ूट. भाडेतत्त्वाने घेतलेली जागाआहे. यात ३५ दुकाने आहेत. प्रत्येक मजल्याची ऊंची ४.२ मीटर आहे व २०० चारचाकी व ३५० दोनचाकी वाहने राहातील येवढे वाहानतळ आहे. या मॉलमध्ये दोन सरकते जीने आणि ४ लिफ्ट आहेत, त्याशिवाय दोन स्वतंत्र सेवा जीने आहेत.

या हॉटेलची मोकळी जागा साधारण २१९००० स्क्वे.फ़ूट. आहे. त्यात ४४००० स्क्वे.फ़ूट. प्रवेशद्वारात, ५०००० स्क्वे.फ़ूट. पहिल्या मजल्यावर, ७५००० स्क्वे.फ़ूट. दुसऱ्या मजल्यावर, आणि ५०००० स्क्वे.फ़ूट. वाहानतळ ही दोन मजल्यावर पसरलेली आहे.

तिसरी ५०००० स्क्वे.फ़ूट. शॉपर्स स्टॉपला भाड्याने दिलेली आहे आणि १५००० स्क्वे.फ़ूट. जागेवर पुस्तकाचे दूकान आहे. मोठ्या दुकानाशिवाय ३० व्हनीला दुकाने, साधारण १००० स्क्वे.फ़ूट. पेक्षा कमी जागेवरील छोंटी दुकाने आणि १५००० स्क्वे.फ़ूट. जागेवर उपहार ग्रह शिवाय सांज रेस्टारंट, स्पा, सलुन आहेत.

कार्यक्रम

संपादन

दिनांक ९-११-२०१३ ते २८-११-२०१३ या वेळी भारतात प्रथमच झालेली जागतिक बुद्दिबळ स्पर्धा या हॉटेलमध्ये झाली होती.[]

बक्षिस (अवॉर्ड)

संपादन

सन २०१२ मध्ये इंटरनॅशनल हॉटेल अवॉर्ड यांनी बेस्ट इंटरनॅशनल हॉटेल मार्केटिंग हा अवॉर्ड लंडन येथे दिला.[] सन २०१३ मध्ये या हॉटेलला भारताचे न्यू हॉटेल कन्स्ट्रक्शन व डिझाईन या प्रकारासाठी कौलालांपूर येथे गौरविण्यात आले.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "दक्षिण भारतातील पहिले हयात रिजेन्सी हॉटेल".[permanent dead link]
  2. ^ "ललित सुरी यांनी ३९० कोटी रुपये मध्ये सप्ततारांकित हॉटेल विकत घेतला".
  3. ^ "हयात रिजेन्सी चेन्नई हॉटेलची पंचतारांकित सुविधा".
  4. ^ "जागतिक बुद्दिबळ स्पर्धा चे आयोजन हयात रिजेन्सी चेन्नई हॉटेलमध्ये करण्यात आले".
  5. ^ "हयात रिजेन्सी चेन्नई हॉटेलनी "सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय हॉटेल विपणन"पुरस्कार जिंकला".
  6. ^ "हयात रिजन्सी चेन्नईनी सर्वोत्तम बांधकाम आणि डिझाईनचा पुरस्कार जिंकला".