स्व-संघटन (इंग्लिश:Self-organization) म्हणजे अशी प्रक्रिया, ज्यामध्यॆ ज्यामुळॆ एखाद्या प्रणालीतील वैश्विक पातळीवरील समन्वय आणि शिस्त, सुरुवातीला अराजक असलॆल्या प्रणालीच्या उपघटकांमधील 'स्थानिक' अंतःक्रियेतून निर्माण होते. [] सामान्यतः ही प्रक्रिया स्वयंभू असते आणि अशा प्रकारचा प्रक्रयेत समन्वय किंवा शिस्त निर्माण करण्यासाठी कुठल्याही बाह्य व्यक्ती किंवा यंत्रणेच्या हस्तक्षेपाची गरज नसतॆ. काही अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून प्रणालीचे उपघटकच अशी शिस्त निर्माण करतात. यातून निर्माण हॊणारी यंत्रणा ही पूर्णपणे विकेंद्रित असते. सामान्यतः ही व्यवस्था अतिशय चिवट (robust) असते आणि दीर्घकाळ टिकणारी व ऋणात्मक पुनर्भरणाच्या (negative feedback) साह्यानॆ स्वतःलाच दुरूस्त करू शकणारी असतॆ.

  1. ^ http://csis.pace.edu/~marchese/CS396x/Computing/Ashby.pdf