स्वारगेट हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक मध्यवर्ती आणि महत्वाचा परिसर आहे.

येथील जेधे चौकात ५ रस्ते एकत्र येतात:

छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, सोलापूर रस्ता, सातारा रस्ता आणि सारसबागेकडे जाणारा रस्ता.

येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे स्वारगेट बसस्थानक तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाचे स्वारगेट बसस्थानक आहे.