स्लीमा
स्लीमा, स्लिएमा किंवा तस-स्लीमा ( माल्टिज: Tas-Sliema : [tas.ˈslɪː.ma] ) हे माल्टामधील शहर आहे. देशाच्या ईशान्य किनाऱ्यावर नॉर्दर्न हार्बर जिल्ह्यातील या शहरात मोठ्या प्रमाणात दुकाने आणि रेस्टॉरंट आहेत.
स्लीमा माल्टामधील सर्वात दाट लोकवस्तीचे शहर आहे.
या भागात इंग्लिशभाषिकांचे प्रमाण मोठे आहे. येथील लोकांना स्लिमिझी म्हणून संबोधतात.