स्लमडॉग मिलियोनेर (चित्रपट)

ऑस्कर पुरस्कार मिळालेला चित्रपट.


स्लमडॉग मिलियोनेर (इंग्लिश भाषा: Slumdog Millionaire) हा २००८ साली प्रदर्शित झालेला इंग्रजी भाषेतील एक ब्रिटिश चित्रपट आहे. हा चित्रपट भारतीय लेखक व राजदूत विकास स्वरूप ह्यांनी २००५ मध्ये लिहिलेल्या "क्यू अँड ए" ह्या कादंबरीवर आधारित आहे.

स्लमडॉग मिलियोनेर
Theatrical release poster
दिग्दर्शन डॅनी बॉईल
निर्मिती क्रिस्चियन कोल्सन
कथा विकास स्वरूप
पटकथा सायमन बोफॉय
प्रमुख कलाकार देव पटेल
फ्रेडा पिंटो
अनिल कपूर
इरफान खान
आयुष महेश खेडेकर
महेश मांजरेकर
संकलन क्रिस डिकन्स
छाया अँथोनी डॉड मँटल
संगीत ए. आर. रहमान
देश ग्रेट ब्रिटन
भाषा इंग्रजी
प्रदर्शित २००८
अवधी १२० मिनीटे


स्लमडॉग मिलियोनेरचे चित्रीकरण मुंबई शहरात झाले आहे. ह्या चित्रपटात मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका मुलाची कथा वर्णन केली आहे. जमाल मलिक हा धारावीमधील तरुण "कौन बनेगा करोडपती" ह्या चित्रवाणीवरील लोकप्रिय स्पर्धेत भाग घेतो व शेवटच्या फेरीपर्यंत पोचतो, ज्यामुळे स्पर्धेचा सुत्रसंचालक अनिल कपूर, पोलीस व इतर लोकांना त्याने फसवाफसवी केल्याचा संशय येतो.

स्लमडॉग मिलियोनेर चित्रपटात अनिल कपूर, इरफान खान, महेश मांजरेकर ह्या भारतीय कलाकारांनी काम केले आहे. चित्रपटाचे संगीत ए. आर. रहमान ह्यांनी दिले आहे ज्यासाठी त्यांना २००९ साली गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.

२२ फेब्रुवारी २००९ रोजी पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने दहा नामांकनांपैकी ८ नामांकनांमध्ये ऑस्कर पुरस्कार पटकावला. संगीतकार ए.आर. रहमान यांना १९८१ नंतर प्रथमच भारतीय कलाकाराला ऑस्कर मिळण्याचा मान मिळाला. या चित्रपटाला खालीलप्रमाणे ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.

  • सर्वोत्तम चित्रपट
  • सर्वोत्तम दिग्दर्शन - डॅनी बॉईल
  • सर्वोत्तम पटकथा
  • सर्वोत्तम छायाचित्रण
  • सर्वोत्तम ध्वनीमुद्रण
  • सर्वोत्तम संकलन
  • सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर- ए. आर. रहमान
  • सर्वोत्कृष्ट गीत - ए. आर. रहमान