संकलक : नरेंद्र, परसरामबास, मालोबास.
नागदेवांच्या जीवनावरील ग्रंथ. रचना इ.स. १३१२. एकूण २६० स्मृती.

स्मृतिस्थळ वाचून नागदेवाचार्य हे कोणत्या योग्यतेचे पुरुष होते व त्यांच्या कर्तृत्वाची उंची काय होती हे कळू शकते. आचार्यांबरोबरच महदाइसा, म्हाइंभट, केसोबास, दामोदरपंडित, हिराइसा यांसारख्या भक्तांची स्वभावचित्रे चरित्रकारांनी काढली आहेत. मुसलमानी आक्रमणाच्या सपाट्यात देशभर झालेल्या धूळधाणीचे वर्णन उल्लेखनीय आहे. सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, रत्नमालास्तोत्र, लीळाचरित्र इ. ग्रंथांच्या रचनेची माहिती स्मृतिस्थळ देते.

“बिनीच्या महानुभाव ग्रंथकारांची माहिती देणारा प्राचिनतम ग्रंथ हाच होय” : बा.वा. देशपांडे.