स्मिता शेवाळे
स्मिता शेवाळे (जन्म : २१ डिसेंबर १९८६, पुणे) या मराठी चित्रपट सृष्टीतील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या "यंदा कर्तव्य आहे" या चित्रपटामार्फत आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, या चित्रपटात अंकुश चौधरी हे त्यांचे सहकलाकार होते.
स्मिता शेवाळे | |
---|---|
स्मिता शेवाळे | |
जन्म |
स्मिता शेवाळे २१ डिसेंबर १९८६ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | यंदा कर्तव्य आहे[१][२] |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | कालाय तस्मै नमः. [३] |
पती | राहुल ओदक |
अपत्ये | कबीर ओदक |
स्मिता शेवाळे याचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले, लहान असल्यापासुनच त्यांना कलेची आणि समाजकार्याची आवड होती, त्यांचा पहिला चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला, त्यानंतर चल लव्ह कर हा त्यांचा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला, त्यानंतर त्यांचे अनेक उत्तम चित्रपट येत गेले, त्या स्वतः नृत्यांगना असल्याने अनेक दूरचित्रवाहिनी तसेच अनेक कार्यक्रमातून त्या रसिकांसमोर आपली कला सादर करत असतात. १४ फेब्रुवारी २०१३ रोजी व्हालेनटाइन डे (प्रेम दिवस) यादिवशी राहुल ओदक यांच्याशी त्यांनी विवाह केला.[४][५][६]
चित्रपट
संपादनस्मिता शेवाळे यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट
दूरचित्रवाणी मालिका
संपादन- कालाय तस्मै नमः
- चार चौघी
- मांडला दोन घडीचा डाव
- श्रीमंत पेशवा बाजीराव
- सावित्री
- अदालत (हिंदी)
- वीर शिवाजी
- तू माझा सांगाती
- स्वराज्य जननी जिजामाता
- .मुरांबा
संदर्भ
संपादन- ^ http://www.imdb.com/name/nm2361282/bio?ref_=nm_ov_bio_sm
- ^ http://marathistars.com/actress/smita-shewale-potos-biography/
- ^ http://marathistars.com/actress/smita-shewale-potos-biography/
- ^ "संग्रहित प्रत". 2020-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-14 रोजी पाहिले.
- ^ http://marathistars.com/actress/smita-shewale-potos-biography/
- ^ http://www.marathiglam.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87-smita-shewale/[permanent dead link]
- ^ http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/hot-gossip/smita-shewale-in-horror-movie/18330
- ^ http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/news/tukapatil-coming-soon/21086
- ^ http://www.marathi.tv/actress/smita-shewale/
- ^ "Muktaai Movie (2024): Cast, Trailer, OTT, Songs, Release Date | Sant Dnyaneshwaranchi Muktaai | संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई | Exclusive 2024 - Rang Marathi". रंग मराठी. 22 जून 2024 रोजी पाहिले.
- ^ https://en.wikipedia.org/wiki/Smita_Shewale