स्नेहलता दसनूरकर

(स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर या पानावरून पुनर्निर्देशित)


स्नेहलता दसनूरकर (७ मार्च १९१८- ३ जुलै, २००३) या मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ होत्या.

स्नेहलता दसनूरकर

आपल्या दीर्घ साहित्य जीवनात त्यांनी ६० च्या वर कथासंग्रहांचे लेखन केले होते.

२००२ मध्ये त्यांनी लिहिलेल्या अवंतिका मालिकेचे आल्फा टीव्ही वर प्रसारण सुरू झाले होते.

स्त्री जीवनातील सुख-दुःखांचे पट उलगडणाऱ्या कथा-कादंबऱ्यांचे हे विश्व मराठी साहित्यात ज्या लेखिकांनी गेल्या शतकाच्या मध्यावर निर्माण केले, त्यातल्या स्नेहलता दसनूरकर या आघाडीच्या लेखिका होत्या.[]

प्रकाशित साहित्य

संपादन
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
आशास्थान कादंबरी मनोरमा प्रकाशन
नजरेची पाखरं कथा संग्रह मीनल प्रकाशन
परतफेड कथा संग्रह मनोरमा प्रकाशन
शपथ कथा संग्रह मनोरमा प्रकाशन
अजन यौवनात मी कथा संग्रह श्री लेखन वाचन भांडार
धडा कथा संग्रह मनोरमा प्रकाशन
ओलावा कादंबरी श्रीकल्प प्रकाशन
जिव्हाळा कादंबरी श्रीकल्प प्रकाशन
रुiपेरी पश्चिमा कथा संग्रह सुयोग प्रकाशन
लाखो बायकांत अशी कथा संग्रह दिलीपराज प्रकाशन
प्रपंच कादंबरी मनोरमा प्रकाशन
उंबरठ्यावर कथा संग्रह मनोरमा प्रकाशन
एक जाळे कादंबरी मनोरमा प्रकाशन
अवंतिका कादंबरी श्रीकल्प प्रकाशन
ममता कथा संग्रह मनोरमा प्रकाशन
जुगार कादंबरी मनोरमा प्रकाशन
मानसीचा राजहंस ऐतिहासिक मनोरमा प्रकाशन
चुलीतली लाकडे कथा संग्रह मनोरमा प्रकाशन
यक्षप्रश्न कादंबरी मनोरमा प्रकाशन
कुत्र्याचं शेपूट कथा संग्रह वसंत बुक स्टॉल
भिंत कादंबरी मनोरमा प्रकाशन
शुभमंगल कथा संग्रह मनोरमा प्रकाशन
याचना कथा संग्रह मनोरमा प्रकाशन
किनारा कथा संग्रह मनोरमा प्रकाशन

संदर्भ

संपादन
  1. ^ "सोज्वळ सृजनाचा दिर्घोत्सव: लोकसत्तेतील आदरांजली". 2016-03-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-09-11 रोजी पाहिले.