मुख्य मेनू उघडा


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Steven Pinker 2005.jpg

स्टीव्हन आर्थर पिंकर (जन्म : माँन्ट्रियाल-कॅनडा, १८ सप्टेंबर १९५४) हे एक कॅनडात जन्मलेले अमेरिकी मानसशास्त्रज्ञ, भाषाशास्त्रज्ञ आणि लोकप्रिय विज्ञान लेखक आहेत. ते हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक असून विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात जॉनस्टोन कौटुंबिक प्रोफेसर आहेत. उत्क्रांत मानसशास्त्र आणि मन संगणकीय सिद्धान्त यांच्या समर्थनासाठी ते प्रसिद्ध आहेत..[१]

डोळ्याने होणारे विषयाचे आकलन आणि मानस-भाषाशास्त्र यांमध्ये पिंकर यांचे शैक्षणिक स्पेशलायझेशन आहे. भाषा, आकारांची ओळख, नजरेने होणारे ज्ञान, लहान मुलांचा भाषा विकास, भाषेमधील नियमित आणि अनियमित घटना, शब्द आणि व्याकरण यांचा मज्जासंस्थेशी असणारा संबंध, टोमणा आणि एउफेमिस्म यांचे मानसशास्त्र, आणि मानसिक प्रतिमा यांचा त्यांच्या प्रायोगिक अभ्यासांमध्ये समावेश आहे. त्यांनी दोन तांत्रिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्यात त्यांनी भाषा संपादनाचा एक सर्वसाधारण सिद्धान्त प्रस्तावित केला आहे, व. त्याचा वापर मुलांना क्रियापदे समजावून सांगण्यात कसा कराता येईल हे सांगितले आहे..

अनेक नियतकालिकांनी जगातील सर्वात प्रभावी विद्वानांमध्ये पिंकर यांची गणना केली आहे.. त्यांना अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन, नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्स, ग्रेट ब्रिटनच्या रॉयल इन्स्टिट्यूटअमेरिकन ह्युमनिस्ट असोसिएशनकडून पुरस्कार मिळाले आहेत. ते अनेक संस्थांच्या संपादकीय आणि सल्लागार मंडळांवर आहेत. विज्ञान आणि समाज या विषयांवरच्या सार्वजनिक चर्चांमध्ये त्यांचा नित्य सहभाग असतो.

जीवनचरित्रसंपादन करा

बालपण, शिक्षण आणि करिअरसंपादन करा

कॅनडाच्या क्वेबेक प्रांतामधल्या माँट्रियाल शहरात पिंकर हे १९५४ साली एका मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात जन्मले.. त्यांच्या आईचे नाव रोझॅलिन आणि वडिलांचे हॅरी पिंकर..[२]

संशोधन आणि सिद्धान्तसंपादन करा