स्क्रू ड्रायव्हर
स्क्रू ड्रायव्हर (मराठीत पेचकस) हे सामान्यपणे हाताने वापरले जाणारे, नेहमी लागणारे, अवजार आहे. त्याचा वापर प्रामुख्याने स्क्रू लावण्यासाठी, घट्ट करण्यासाठी किंवा लावलेला स्क्रू काढण्यासाठी केला जातो.
हात-साधन | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
उपवर्ग | हात साधन, हत्यार | ||
---|---|---|---|
भाग |
| ||
Physically interacts with |
| ||
| |||
![]() |
रचनासंपादन करा
हातात पकडण्याची मूठ आणि धातूचा दांडा अशी हाताने वापरल्या जाणाऱ्या स्क्रू ड्रायवरची सामान्य रचना असते. स्क्रू ड्रायव्हरच्या दांड्याचे टोक स्क्रूच्या डोक्यावर अडकवून हाताने मूठ फिरवून, स्क्रू लावता, घट्ट करता किंवा काढता येतो. स्क्रू ड्रायव्हर स्क्रूच्या डोक्यावर अडकवून स्क्रू लावण्यासाठी, काढण्यासाठी बल लावण्याची आवश्यकता असते.
स्क्रू ड्रायव्हरची मूठ ही काम करण्याच्या सोयीच्या दृष्टीने प्रामुख्याने लाकूड, प्लास्टिक, रबर या पासून बनवलेली असते. स्क्रू ड्रायव्हरचा दांडा पोलाद, इतर मिश्र धातूंचा बनवलेला असतो. काही स्क्रू ड्रायव्हरच्या दांड्याचे टोक चुंबकीय बनवलेले असते. अतिशय छोट्या आकाराचे स्क्रू किंवा अशा काही जागा जिथे हाताने स्क्रू हाताळणे अवघड असते, अशा ठिकाणी स्क्रू पकडून ठेवण्यासाठी चुंबकीय टोक असलेला स्क्रू ड्रायव्हर वापरला जातो.
उत्पादन क्षमता वाढावी म्हणून, स्क्रू ड्रायव्हरच्या एकाच मुठीमध्ये बदलता येणारे दांडे अशी रचना असलेला स्क्रू ड्रायव्हर वापरला जातो.
प्रकारसंपादन करा
स्क्रू ज्या प्रमाणे लहानापासून मोठ्या आकाराचे असतात त्या प्रमाणे स्क्रू ड्रायव्हर देखील लहान आकारापासून मोठ्या आकाराचे असतात. प्रमाणित स्क्रूच्या डोक्याच्या आकार आणि प्रकारावरून वरून, स्क्रू ड्रायव्हरच्या दांड्याच्या टोकाचे आकार आणि प्रकार निश्चित केलेले आहेत.
स्क्रू ड्रायव्हरचे काही प्रकार[१] -
- स्लॉटेड
- फिलिप्स
- स्क्वेअर टिप
- सिक्स पॉइंट
- स्टबी
खूप मोठ्या मुठीच्या व दांड्याची एकूण लांबी छोटी असलेल्या स्क्रू ड्रायव्हरला 'चबी स्क्रू ड्रायव्हर' म्हणतात.
वापरसंपादन करा
स्क्रू ड्रायव्हरचा वापर धातू काम, यंत्र जोडणी आणि दुरुस्ती, वाहन जोडणी आणि दुरुस्ती, विद्यूत उपकरण जोडणी आणि दुरुस्ती, बांधकाम, सुतारकाम, घरगुती यंत्र सामग्री जोडणी आणि दुरुस्ती अशा अनेक उद्योगात मोठ्या प्रमाणावर होतो. फार मोठ्या प्रमाणात स्क्रू बसवायचे किंवा काढायचे असतील स्क्रू ड्रायव्हरचा दांडा उलट सुलट फिरणाऱ्या ड्रिलिंग मशीनला जोडून ते काम करतात. स्क्रूंच्या प्रमाणबद्धतेमुळे, आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे जेव्हा मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायची आवश्यकता असते, तेव्हा हाताने वापरल्या जाणाऱ्या स्क्रू ड्रायव्हर ऐवजी वीजेवर किंवा हवेच्या दाबावर (न्यूमॅटिक)चालणाऱ्या स्क्रू ड्रायव्हरचा वापर केला जाऊ लागला आहे.
चित्रदालनसंपादन करा
संदर्भसंपादन करा
- ^ "Screwdrivers (hand tool) Information | Engineering360". www.globalspec.com. 2018-08-05 रोजी पाहिले.