सौर वस्तुमान (चिन्ह: M) (इंग्रजी: solar mass - सोलर मास) हे खगोलशास्त्रातील वस्तुमानाचे एक एकक आहे. याचा उपयोग तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, दीर्घिका यांचे वस्तुमान दर्शवण्यासाठी केला जातो. एक सौर वस्तुमान म्हणजे सूर्याचे वस्तुमान होयः

M = १.९८८५५ ± ०.०००२५ × १०३० किलोग्रॅम[१]

१ सौर वस्तुमान हे पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ३,३२,९४६ पट किंवा गुरूच्या वस्तुमानाच्या १०४८ पट असते. एखाद्या ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या २० पट असेल तर त्याचे वस्तुमान २०M आहे असे म्हटले जाते.

संदर्भसंपादन करा

  1. ^ "२०१४ ॲस्ट्रॉनॉमिकल कॉन्स्टंट्स (2014 Astronomical Constants)" (PDF) (इंग्रजी भाषेत).