सोव्हिएत संघाचा कम्युनिस्ट पक्ष

सोव्हिएत संघाचा कम्युनिस्ट पक्ष (रशियन: Коммунистическая партия Советского Союза) हा सोव्हिएत संघ ह्या भूतपूर्व देशामधील एकमेव राजकीय पक्ष होता. १ जानेवारी १९१२ रोजी व्लादिमिर लेनिनने ह्या कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. २९ ऑगस्ट १९९१ रोजी सोव्हिएत संघाच्या विघटनादरम्यान कम्युनिस्ट पक्ष बरखास्त करण्यात आला.

कम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह

कार्ल मार्क्स व लेनिन ह्यांच्या विचारवादावर आधारित असलेल्या कम्युनिस्ट पक्षाचे सोव्हिएत संघाच्या जवळजवळ सर्व अस्तित्वादरम्यान देशावर संपूर्ण नियंत्रण होते. नियमानुसार पक्षाचा सरचिटणीस सोव्हिएत संघाचा सरकारप्रमुख व राष्ट्रप्रमुख ह्या पदांवर आपोआप नियुक्त होत असे.

१९८८ सालच्या मिखाईल गोर्बाचेवने आणलेल्या अनेक धोरणांमुळे कम्युनिस्ट पक्षाचा एकछत्री अंमल कमी झाला.

सरचिटणीसांची यादी

संपादन
नाव
(जन्म-मृत्यू)
चित्र कार्यकाळ
एलेना स्तासोव्हा
(1873–1966)[१]
  एप्रिल 1917–1918
याकोव्ह स्वेर्दलोव्ह
(1885–1919)[२]
  1918 – 16 मार्च 1919
एलेना स्तासोव्हा
(1873–1966)[१]
  मार्च 1919 – डिसेंबर 1919
निकोलाय क्रेस्तिंस्की
(1883–1938)[३]
  डिसेंबर 1919 – मार्च 1921
व्याचेस्लाव्ह मोलोतोव्ह
(1890–1986)[४]
  मार्च 1921 – एप्रिल 1922
जोसेफ स्टॅलिन
(1878–1953)[५]
3 एप्रिल 1922 – 16 ऑक्टोबर 1952
निकिता ख्रुश्चेव्ह
(1894–1971)[६]
  14 सप्टेंबर 1953 – 14 ऑक्टोबर 1964
लिओनिद ब्रेझनेव
(1906–1982)[७]
14 ऑक्टोबर 1964 – 10 नोव्हेंबर 1982
युरी आंद्रोपोव्ह
(1914–1984)[८]
  12 नोव्हेंबर 1982 – 9 फेब्रुवारी 1984
कॉन्स्टान्टिन चेरनेन्को
(1911–1985)[७]
13 फेब्रुवारी 1984 – 10 मार्च 1985
मिखाईल गोर्बाचेव
(जन्म 1931)[९]
  11 मार्च 1985 – 24 ऑगस्ट 1991
व्लादिमिर इवाश्को
(1932–1994)[१०]
24 ऑगस्ट 1991 – 29 ऑगस्ट 1991
  1. ^ a b McCauley 1997, पान. 117.
  2. ^ Williamson 2007, पान. 42.
  3. ^ Rogovin 2001, पान. 38.
  4. ^ Phillips & 2001 20.
  5. ^ Brown 2009, पान. 59.
  6. ^ Taubman 2003, पान. 258.
  7. ^ a b Chubarov 2003, पान. 60.
  8. ^ Vasil'eva 1994, पाने. 218.
  9. ^ Service 2009, पान. 435.
  10. ^ McCauley 1998, पान. 314.